Home नाशिक नाशिक न्यायालयातील वकील भगिनीचे आगळे वेगळे हळदी कुंकू समारंभ संपन्न

नाशिक न्यायालयातील वकील भगिनीचे आगळे वेगळे हळदी कुंकू समारंभ संपन्न

124

आशाताई बच्छाव

IMG_20240204_064618.jpg

नाशिक,( विनया नागरे प्रतिनिधी)-आपली भारतीय संस्कृती ही विविध परंपरेने नटलेली आहे अगदी सुंदर अशी भारतीय संस्कृती असल्या कारणास्तव विविध सण उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात याआपल्यकडे साजरा केले जातात त्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा उत्सव म्हणजे हळदीकुंकू नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येत असतो ह्या उत्सवात संक्रांत असे म्हणतात की तिळगुळ घ्येवुन तोंड गोड केले जाते.सण विविधतेने नटलेल्या असल्याकारणास्तव या सणाला एक वेगळे महत्त्व आहे आणि त्यातच महिलांनी हळदीकुंकू करणे हे आहे वेगळेच आहे त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिला ह्या विविध ठिकाणी विविध पद्धतीने हळदीकुंकू देऊन वाण देण्याची प्रथा असल्यामुळे हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. नाशिक जिल्हा न्यायालयातील महिलाही देखील मागे राहिल्या नसून दर्श दरवर्षीप्रमाणे त्यांनीही अगदी थाटामाटात आणि आनंदात हळदीकुंकू चा उत्सव साजरा केलेला आहे जरी कोट असला तरी देखील रूढी परंपरा आणि संस्कृती जपणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे सांभाळून त्यांनी हा उत्सव दिनांक 30 जानेवारी रोजी नाशिक जिल्हा न्यायालय येथे पार पाडला, या उत्सवामध्ये सर्व न्यायालयातील न्यायाधीश महिलांनी सहभाग घेतला तसेच या ठिकाणी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन अँड सोनल कदम, अँड श्रद्धा कुलकर्णी, अँड स्वप्न राऊत , अँड पुनम शीनकर , अँड प्रणिता कुलकर्णी, अँड राणी तळेकर , अँड सुप्रिया आमोदकर, अँड अश्विनी गवते , अँड सोनल गायकर या सर्वांनी अगदी उत्तम प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते तसेच मेहंदी स्पर्धा मध्ये स्पर्धकांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला तसेच अँड वृषाली रबके यांनी एकांकिका सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली . अँड वसुंधरा रामराजे , अँड अपर्णा कुलकर्णी, अँड पुष्पा ढवळे , अँड वैशाली कोकाटे यासर्व विधिज्ञांनी सदर स्पर्धेमध्ये विजय मिळवला तसेच मान्यवरांनी खूप उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले सर्व आयोजक समितीकडून विजेत्यांना पुष्पगुच्छ व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमास अँड मोरे , अँड विनया नागरे यांनी मुलाचे सहकार्य केले अशाप्रकारे अगदी खेळीमेळीचा वातावरणात हळदी कुंकू समारंभ पार पडला.