Home सामाजिक मनन चिंतन🌼 विषय:- आजच्या स्त्रीच्या विवाहातील अस्थिर तीन कोन.?

मनन चिंतन🌼 विषय:- आजच्या स्त्रीच्या विवाहातील अस्थिर तीन कोन.?

106

आशाताई बच्छाव

IMG_20240204_055936.jpg

🌼मनन चिंतन🌼

विषय:- आजच्या स्त्रीच्या विवाहातील अस्थिर तीन कोन.?

ज्या उद्देशाने स्त्रियांना शिक्षणाच्या वाटा मोकळ्या झाल्या तसेच ज्या उद्देशाने माणसाच्या विचारात प्रगल्भता आली तो हेतू/इंटेन्शन/उद्देश (मोजके अपवाद वगळता) बाजूलाच राहिलेला दिसून येतोय.

एक बाब प्रकर्षाने जाणवते, कलियुगाच्या प्रत्येक काळात मनुष्य तराजूच्या कोणत्या तरी एका बाजूला झुकण्याचिच प्रक्रिया एकंदरीत घडलेली आढळते.

अशिक्षित शाप वाटला म्हणून शिक्षणाची क्रांती घडवून आणली परंतु दुर्दैवाने हेच केवळ सर्टिफिकेटचे शिक्षण आज नोकरी, पद, पैसा , प्रतिष्ठा याच्या एकांगी फॉर्म्युला मुळे शाप आहे असे म्हटले तर वावगं ठरणार नाही.

दोन महिन्यापूर्वी प्राध्यापक निलेश कोरडे महाराज यांच्या व्याख्यानात ते म्हणतात की, त्यांच्याकडे एक जोडपे समुपदेशनासाठी आले होते. लग्नाच्या पाच वर्षांपासून त्या पत्नीच्या पगारातील पैसे पतीने एकदाही मागितले नव्हते. पाच वर्षानंतर नवीन फ्लॅट घेण्याचे ठरल्यावर पतीने पत्नीकडे पैसे मागितल्यावर तिने एक रुपया सुद्धा नाही असे सांगितले, सत्य हे समजले की त्या पत्नीने तिचा सर्व पगार स्वतःची चैन करून उरल्यावर तिच्या आईला देत होती.

भारतीय विवाह संस्थेच्या सर्व संकल्पना मोडीत काढून स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृतीने थैमान घातले आहे यातील root cause वर पोहचण्याची मानसिकता जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत कलियुग तप्त होऊन त्राही त्राही भोगायला भाग पाडणार आहे हे निश्चित.

ता.क:- आजची विवाहासाठी इच्छा नसलेली स्त्रीची मानसिकता अजाणतेपणी त्रिकोणाच्या तीन लुडकत्या कोणता फसत चाललेली आहे.

एक कोन- नोकरी, पद व पैसा प्रतिष्ठा यातच जीवनाचे प्राथमिक ध्येय मानल्यामुळे.

दुसरा कोन:- कन्यादान होऊन ही माहेरची ओढ व आसक्ती कमी होण्याऐवजी ती ओढ घट्ट पकडून ठेवली जात आहे.

तिसरा कोन:- लग्न होऊनही संसार, उत्तम संतती किंवा कुटुंब वत्सल परिवार ही प्राथमिक मानसिकता याचा अभाव असल्याने परिवार व भारतीय संस्कार, संस्कृती याविषयी जबरदस्तीने करावी लागणारी कसरत.

कटू आहे परंतु हेच सत्य कारण असून व यातूनच समस्येवर समाधान सापडेल असे माझे सातत्याने निरीक्षण, अभ्यास, चिंतन, लेखनातून मत आहे.

ता.क:- माहेरी मदत करने, सेवेचा आधार देणे हे कर्तव्य आहे परंतु प्रथम सासरची नाती व स्नेह जिंकून मूल्य आधारित संसार जीवनाचे लक्ष्य असायला हवे.

Fire आग या विषयावर प्रेजेनटेशन ऐकताना त्रिकोण (Triangle) दाखवून आग का लागते हे सांगितले जाते. ते तीन कोन आहेत, Fuel (इंधन Heat), oxygen (हवा) आणि ज्वलनशील पदार्थ.

या तिन्ही पैकी एक जरी वेगळे केले तरी आग विझते.

कौटुंबिक आगीचे सुद्धा हेच तीन कोन मुख्य कारण असून उपायही त्यातच दडला आहे, निदान एक तरी कोन मोडून काढायचा.

टीप:- वरील शब्दातीत मर्यादेच्या टिप्पणीत एकांगी अर्थबोध घेऊन कोणीच दुःखी होऊ नये, तसे दुःख वाटले तर अध्यात्म स्तरावर सर्वांगी चिंतन, मंथन करण्यासाठी अवश्य रिंग करावी.

🙏शिवाजी कणसे  मुंबई 🌼8208870761🌼03.01.2023 🌼सुधार-27.06.2023🌞🕉️

Previous articleलोहा सार्वजनिक शिवजयंती मंडळ अध्यक्षपदी पैलवान नारायण पवार तर सचिव पदी शहाजी पवार यांची निवड
Next articleआत्मविश्वास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.