Home नांदेड घंटागाडीत पुजेचे साहित्य टाकण्यासाठी घंटागाडीमध्ये वेगळी व्यवस्था केल्याबद्दल देगलूर नगर परिषदेचे आभार.

घंटागाडीत पुजेचे साहित्य टाकण्यासाठी घंटागाडीमध्ये वेगळी व्यवस्था केल्याबद्दल देगलूर नगर परिषदेचे आभार.

464

आशाताई बच्छाव

IMG_20240201_163945.jpg

घंटागाडीत पुजेचे साहित्य टाकण्यासाठी घंटागाडीमध्ये वेगळी व्यवस्था केल्याबद्दल देगलूर नगर परिषदेचे आभार.

देगलूर तालुका प्रतिनिधी, (गजानन शिंदे)

देगलूर :- देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब ,स्वच्छता निरीक्षक मार्तंड वंनजे साहेब यांचे देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी मानले आभार.
देगलूर नगर परिषदेच्या वतीने प्रत्येक वार्डातील कचरा गोळा करण्यासाठी नगरपरिषदेने घंटागाडीची व्यवस्था केली,पण समस्त हिंदू बांधवांनी पुजा केलेलं साहित्य हे घंटागाडी मध्ये कचरा समवेत कसं टाकायचे या संकोचाने ते साहित्य घरातच गोळा करून ठेवायचं,या मुळे घरात डासांचे प्रमाण वाढुन रोग राईला आमंत्रण देण्यासारखे होयाचे, त्यासाठी अनेकदा लोकांनी घंटागाडी मधील वाहण चालकांना अनेकदा सांगूनही या गोष्टी कडे कोणी लक्ष दिल्याने, लोकांनी देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांना हि बाब लक्षात आणून दिली असता, देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी यांनी जानेवारी मध्ये देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार देऊन निर्मल्यसाहित्य (पुजेचे साहित्य) टाकण्यासाठी एक वेगळी घंटागाडी किंवा घंटागाडीमध्ये निर्मल्यसाहित्य साठी वेगळी व्यवस्था करण्याबाबत विनंती केली असता, देगलूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब व स्वच्छता निरीक्षक मार्तंड वंनजे साहेब साहेब यांनी देगलूर शहरातील प्रत्येक घंटागाडीच्या पाठीमागे पुजेचे साहित्य निर्मल्यसाहित्य टाकण्यासाठी घंटागाडीमध्ये व्यवस्था केली असुन,या कार्यामुळे देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण साहेब व स्वच्छता निरीक्षक मार्तंड वंनजे साहेब यांचे देगलूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी आभार मानले…

Previous articleदेगलूर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन.
Next articleठाणेदार धनंजय पाटील यांची पत्रकार संजीव भांबोरे व पत्रकार सय्यद जाफरी यांनी घेतली सदिच्छा भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.