Home उतर महाराष्ट्र वारकरी निघाले निवृत्तीरायाच्या भेटीला. सालाबादप्रमाणे पौष वारी निमित्त

वारकरी निघाले निवृत्तीरायाच्या भेटीला. सालाबादप्रमाणे पौष वारी निमित्त

110

आशाताई बच्छाव

IMG_20240128_074013.jpg

म्हसदी,(श्रीहरी बोरसे प्रतिनिधी)- वारकरी निघाले निवृत्तीरायाच्या भेटीला.
सालाबादप्रमाणे पौष वारी निमित्त
श्री संत नामदेव महाराज खालसा अखिल भारतीय कुंभमेळा परिषद व अखिल विश्व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने
कजवाडे ते श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर पायी दिंडीचे कजवाडे येथून प्रस्थान झाले महामंडलेश्वर श्री श्री १००८ अनंतदासजी महाराज कजवाडेकर यांच्या मार्गदर्शनाने दिंडीचे प्रस्थान झाले.
कजवाडे येथील ह.भ.प.मधुकर बारकू कापडणीस यांच्याकडे भोजनाचा आनंद घेऊन रात्री ह.भ. प.सविताताई महाराज खैरनार यांचा कीर्तनाचा कार्यक्रम झाला. सकाळी ह.भ.प.राजेंद्र नारायण बोरसे याच्याकडे चहा नाष्टा करून दिंडीचे त्र्यंबकेश्वर कडे प्रस्थान झाले. यावेळी कजवाडे गावातील व परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कजवाडे येथून श्री संत नामदेव महाराज यांच्या पादुकांचा रथ घेऊन वारकरी ज्ञानोबा तुकोबा यांच्या भजनाने दंग होऊन संत निवृत्तीरायांच्या भेटीला निघाले.

Previous articleभंडारा तालुक्यातील निमगाव येथे प्रजासत्ताक दिनी नृत्यांगना हिंदवी पाटील यांचा कार्यक्रम संपन्न
Next articleलोकशाहीचा पाया मजबूत व भक्कम करण्यासाठी मतदार जनजागृती आवश्यक -तहसीलदार राजाभाऊ कदम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.