आशाताई बच्छाव
संगमनेर आगारांतर्गत प्रवासी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आगार प्रमुखांना निवेदन
प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलनाचा इशारा
संगमनेर दिपक कदम- संगमनेर आगारांतर्गत प्रवासी व विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात विविध संस्था, संघटनांच्या वतीने संगमनेर आगारप्रमुख श्री प्रशांत गुंड यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, बस स्थानकातील सुरक्षारक्षकांची अनियमितता, बस गाड्यांच्या वेळापत्रकाची फलकावर माहिती असावी, तालुक्यातील खेड्यापाड्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन बस स्थानकापासून घुलेवाडी ते अमृतवाहिनी कॉलेज पर्यंत शटल बस सुरू करावी, पार्किंग स्टॅन्ड बरोबरच स्थानकात गर्दुल्ले व चोरट्यांचे रात्रीचे खुलेआम फिरणे व चोरीच्या काही घटना लक्षात घेता पोलीस चौकी चाेवीस तास कार्यान्वित असावी. सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करावी, नाशिक व पुणे येथून येणाऱ्या विना थांबा बसेस ला संगमनेर स्थानकात थांबा देण्यात यावा शहराची ओळख असणाऱ्या बस स्थानकाची स्वच्छ व सुंदर संकल्पना अमलात आणावी, हिरकणी कक्ष कार्यान्वित करावा, महिला सुरक्षा रक्षकाची नेमणूक व्हावी आदी महत्त्वाच्या प्रश्नसंदर्भात उपस्थित पदाधिकारी संजय क्षत्रिय, लहानु भाऊ सदगीर, राजेंद्र फरगडे, अनिल भोसले, कारभारी देव्हारे, अर्जुन वाघ, अनंत दिवेकर, राजाभाऊ देशमुख, विनोद गायकवाड, आदित्य घाटगे, अजित मणियार, मूरतजा बोहरी आदींनी आपल्या भावना आगारप्रमुखासमोर व्यक्त केल्या त्यावर आगार प्रमुख श्री गुंड यांनी सकारात्मक चर्चा करून प्रश्न सोडविण्यासंदर्भातील आश्वासन दिले संजय क्षत्रिय व राजेंद्र फरगडे यांनी वरील मागण्यांची पूर्तता लवकरात लवकर व्हावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. अनिल भोसले यांनी यावेळी निवेदनाचे वाचन केले.
यावेळी अनिल सातपुते, तौसीफ मणियार, डॉ. ताैसिफ तांबोळी, खंडू सातपुते, भाऊसाहेब वैद्य, गोरक्ष सदगीर, विवेक मुळे, सागर पन्हाळे, अँड.राजू खरे, संजय शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.






