Home अमरावती धारणीचे प्राकृतिक व पारंपरिक सौंदर्य जगासमोर आले पाहिजे -आ.सौ.सुलभाताई खोडके

धारणीचे प्राकृतिक व पारंपरिक सौंदर्य जगासमोर आले पाहिजे -आ.सौ.सुलभाताई खोडके

106

आशाताई बच्छाव

IMG_20240121_095002.jpg

धारणीचे प्राकृतिक व पारंपरिक सौंदर्य जगासमोर आले पाहिजे -आ.सौ.सुलभाताई खोडके

वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी येथे स्नेहसंमेलन सोहळा थाटात

दुर्गम वाटेवरचा प्रवासी या चरित्रग्रंथातून नानासाहेब भिसे यांचे संघर्षमय जीवन प्रतिबिंबित होते- आ. सौ. सुलभाताई खोडके
गजानन जिरापुरे
जिल्हा प्रतिनिधी अमरावती
अमरावती २१ जानेवारी :- धारणी-मेळघाट म्हटले की नेहमीची कुपोषण व दुर्गम व अतिदुर्गम भाग असे चित्र बिंबविले जाते. मात्र धारणी येथील नैसर्गिक सौंदर्य , लोकजीवन तसेच सभ्यता व संस्कृतीने एक लौकिक निर्माण केला आहे. त्यामुळे धारणीचे प्राकृतिक व पारंपरिक सौंदर्य जगासमोर आले पाहिजे, यासाठी सर्वानी मिळून सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. केवळ शासनाच्या विविध योजनांनी विकास होणार नसून शिक्षणातून नवे परिवर्तन घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी केले.
दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट, धारणी द्वारा संचालित व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ ,अमरावती द्वारा संलग्नित श्री. वसंतराव नाईक महाविद्यालय धारणी , च्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित स्नेहसंमेलनच्या उद्घाटनाप्रसंगी त्याबोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर ट्रस्ट च्या अध्यक्ष वीणाताई मालवीय , उपाध्यक्ष अनंत भिसे, मेळघाट भूषण नानासाहेब भिसे , माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे , प्राचार्य डॉ. विजय कुमार गवई , अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाषराव बोन्डे ,माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल,ट्रस्ट चे कोषाध्यक्ष प्रदीप भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या वतीने मेळघाट भूषण नानासाहेब भिसे यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. तसेच नानासाहेबांच्या जीवनावर आधारित दुर्गम वाटेवरचा प्रवासी या चरित्रग्रंथाचे प्रकाशन सुद्धा मान्यवर अतिथींच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलतांना आमदार सौ. सुलभाताई खोडके म्हणाल्या की, धारणी -मेळघाट सारख्या भागात शिक्षणाचा प्रसार व प्रचार व्हावा तसेच सामाजिक कार्यातून स्थानिकांचा सर्वांगीण विकास व्हावा ,यासाठी नानासाहेब भिसे यांचा अविरत संघर्षमय प्रवास लढा व कार्य हे उल्लेखनीय आहे. दुर्गम वाटेवरचा प्रवासी या चरित्रग्रंथातून नानासाहेब भिसे यांचे संघर्षमय जीवन प्रतिबिंबित असून यातून नवीन पिढीला प्रेरणा मिळणार असल्याचे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी शॉर्टकटचा मार्ग न अवलंबता जिद्द , मेहनत व अथक परिश्रमातून पुढे यावे , प्रत्येक संधीचे सोने करून आत्मविश्वासाने प्रत्येक आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन सुद्धा आमदार महोदयांच्या वतीने करण्यात आले. दरम्यान स्नेहसंमेलना अंतर्गत आयोजित विविध खेळ व स्पर्धा ,नृत्य व नाट्य स्पर्धा , रांगोळी स्पर्धा आदींचे उदघाटन आमदार महोदयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक कलावंतांनी आदिवासी लोकनृत्य सादर करून आपल्या सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडविले. कार्यक्रमाला दयाराम पटेल स्मारक ट्रस्ट, धारणीचे पदाधिकारी , तसेच श्री. वसंतराव नाईक महाविद्यालय धारणीयेथील प्राध्यापक वृंद , शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित