Home अमरावती देशात धार्मिक, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न. पुरुषोत्तम खेडकर.

देशात धार्मिक, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न. पुरुषोत्तम खेडकर.

106

आशाताई बच्छाव

IMG_20240121_093254.jpg

देशात धार्मिक, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न.
पुरुषोत्तम खेडकर.
————-
दैनिक
पी एन देशमुख.
अमरावती जिल्हा
अमरावती.
देशात सध्या सामाजिक आणि धार्मिक अस्थिरता निर्माण झाली आहे. अशा या परिस्थितीशी लढा देण्यासाठी एकत्र येऊन पुन्हा महापुरुषांचा विचार आजच्या युवकांमध्ये पोहोचविण्यात ची गरज आहे. याकरता मराठा सेवा संघाच्या वतीने जनसंवाद दौरा सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासोबत संभाजी ब्रिगेड ची युती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी मध्ये ठाकरे गटाला मिळणाऱ्या एकूण जागा पैकी बुलढाणा आणि हिंगोली या दोन जागेची मागणी करण्यात आल्याचे पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली. मराठा सेवा संघाच्या वतीने राज्यभर दीड.१६जानेवारी तेथील.३१ जानेवारीपर्यंत जलसंवाद दौरा सुरू करण्यात आला आहे. या निमित्ताने पुरुषोत्तम खेडेकर शनिवारी अमरावतीत होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी पत्रकार परिषदेतून संवाद साधला. ते म्हणाले सध्या देशात युवकांमध्ये रोजगारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे तसेच बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारी बंद करणारे अनेक निर्णय होत आहे. देशातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा नष्ट करण्याचे काम सुरू आहे. महापुरुषाच्या विरोधात बोलणारी लोकं महाराष्ट्रात येत आहेत. त्यामुळे मराठा सेवा संघ पुन्हा एकदा जनसंवाद दौऱ्यातून महापुरुष विचार मांडणारे नवा युवक तयार करून पुन्हा एकदा कामाला लागली आहे. कोविड नंतर मराठा सेवा संघाचे काम काही प्रमाणात कमी झाले होते. त्याला पुन्हा सुरू करण्याचा उद्देशाने जनसंवाद दौरा आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्याशी संभाजी ब्रिगेडची युती असून येणाऱ्या काळात महाविकास आघाडी साठी करणार असल्याचेही पुरुषोत्तम खेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी अरविंद गावंडे ,अविनाश चौधरी ,मधुकर मेहकरे , अर्जुन तनपुरे उपस्थित होते.

Previous articleयुती केली तरच टीकाल नाहीतर जेलमध्ये जाल- प्रकाश आंबेडकर.
Next articleधारणीचे प्राकृतिक व पारंपरिक सौंदर्य जगासमोर आले पाहिजे -आ.सौ.सुलभाताई खोडके
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.