आशाताई बच्छाव
जि.प उच्च प्राथ.शाळा ओझर येथे
तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ चाळीसगाव आयोजीत
“राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस ” संपन्न
ओझर ,चाळीसगाव,( प्रतिनिधि विजय पाटील):- येथील जि. प. उच्च प्राथ.शाळा ओझर येथे दि:११ I१ I२०२४ रोजी ठिक-२ : वाजता शाळेत तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघातर्फ राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस संपन्न झाला . यावेळी दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती श्री एन के वाळके साहेब अध्यक्षस्थानी होते . त्यांनी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती व Protection to good Samaritans बद्दल अनमोल मार्गदर्शन केले . त्यांनी विदयार्थ्यामंध्ये हसतखेळत आंतरक्रिया घडवून आणली . मुलांना प्रश्न विचारून प्रज्ञावान विदयार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षिसेही दिले. मुले ही राष्ट्राची संपत्ती असून गुन्हेगारी वृत्तीकडे न जाता संस्कारक्षम विदयार्थी घडावे या बदल सुरेख माहिती दिली .यानंतर शीघ्रकवी रमेश पोतदार यांनी आपली प्रबोधनपर कविता सादर करून वाहवा मिळवली .पो.कॉन्स्टेबल आबा वाघ व दिपक पाटील यांनी रस्ता सुरक्षा व रहदारीचे नियम याबाबत मार्गदर्शन केले .यावेळी पर्यावरण मित्र शालिग्राम निकम निर्मित” पर्यावरण साहित्य प्रदर्शन ” भरविण्यात आले. त्या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन न्यायाधीश एन.के. वाळके साहेबांनी करून, त्यांनी त्यांचे तोंडभरून कौतूकही केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शालिग्राम निकम यांनी केले तर आभार मुख्याध्यापिका छाया पाटील यांनी मानले . यावेळी विचार मंचावर कें प्र जयप्रकाश चौधरी , गावाचे सरपंच सौ पवार ताई , दिपक पवार , देवेश पवार , उपशिक्षक मंदा चव्हाण , धनंजय आमले ,सतिलाल सोनवणे , वंदना पाटील, दिलीप महाजन सर व चेतन गुजर उपस्थित होते .एकंदरीत कार्यक्रम छान सादर झाला .






