Home उतर महाराष्ट्र शनिशिंगणापूर येथे भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत

शनिशिंगणापूर येथे भारत संकल्प यात्रेचे जल्लोषात स्वागत

97

आशाताई बच्छाव

IMG_20240112_181102.jpg

नेवासा ,( कारभारी गव्हाणे )                           मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा आज नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर या गावात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा.खा.श्री सदानंदजी तनवडे साहेब (राज्यसभा सदस्य तथा भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष गोवा), यांच्या हस्ते रथाचे स्वागत करून रेबिन कापण्यात आली. जय हरी आमदार बाळासाहेब मुरकुटे पाटील यांनी नागरिकांना मोदी सरकारच्या योजनांची माहिती दिली व जन आरोग्य योजनेचे आयुष्यमान भारत कार्ड, प्रधानमंत्री घरकुल, शंभर रुपयात उज्वला गॅस, बचत गटांना कर्ज वाटप, अशा केंद्र सरकारच्या विविध योजनांचाचे कार्ड वाटण्यात आले.या योजनेचा प्रत्यक्ष लाभ सदानंदजी तनवडे साहेब तसेच बाळासाहेब मुरकुटे पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आला
यावेळी, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील, मा.श्री. भाऊसाहेब फुलारी तालुका अध्यक्ष भाजपा, नारायानजी काळे, सुनील पतंगे तहसीलदार साहेब, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, तलाठी,महिला बालकल्याण विभाग आदिकारी, मा.श्री बाळासाहेब बानकर, मा. सौ पुष्पाताई बाळासाहेब बानकर सरपंच शनिशिंगणापूर शरदजी जाधव संभाजी गडाख सचिन मोटे माऊली सोनवणे दादासाहेब ढेरे विशाल धनगर रौंदळ महाराज दीपक निमसे रावसाहेब होन जाधव मामा प्रशांत तुवर संभाजी जगताप बाबासाहेब नवथर दत्तात्रय राऊत रामनाथ नागोडे तसेच विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleकुस्तीला अधिकाधीक वैभव मिळण्यासाठी प्रयत्न करणार ▪️आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कुस्ती स्पर्धेचे थाटात उद्घाटन
Next articleनाशिककरांच्या प्रेमाची प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर बरसात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.