Home नाशिक जनता विद्यालयात गणित दिन साजरा

जनता विद्यालयात गणित दिन साजरा

144

आशाताई बच्छाव

IMG_20231224_062751.jpg

दि. २३/१२/२

जनता विद्यालयात गणित दिन साजरा

नाशिक, दिलीप चव्हाण:- मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक येथे दि. २३ रोजी श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयात गणित दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बुध्दीचा व कलेचा अधिपती श्रीगणेशाच्या मंत्र गायनाने झाली. शाळेच्या गीतमंचाने गायन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी. शिंदे होत्या. श्रीनिवास रामानुजन ह्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर गणित विषयाबद्दल प्राची बादशे , इश्वरी शहाणे, निवेदिता धुमाळ, तन्मयी आवारे ह्या विद्यार्थ्यांनीनी माहिती दिली व विद्यालयमध्ये गणित विषयाबाबतची जागृता निर्माण केली. विद्यालयात रांगोळी व गणिताचे चार्ट इ. ह्यांचे विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन सुध्दा आयोजित करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा पगारे हिने केले. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी.शिंदे , एम.एस.पिंगळे व आदी शिक्षक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.

Previous articleम्हसदी येथील गणू महाराजांना भारतीय कौशल्य पुरस्कार,
Next articleअस्मिता शंकर बिल्लाळें हिने जिजाऊ जन्मोत्सव 2023 मधे जिजाऊ वेशभुषा स्पर्धेत द्वितीय पारितोषिक मिळवले .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.