Home गडचिरोली साधना जराते च्या मृत्यू प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा

साधना जराते च्या मृत्यू प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा

103

आशाताई बच्छाव

IMG_20231214_061411.jpg

 

साधना जराते च्या मृत्यू प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करा

आमदार भाई जयंत पाटील यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ): –धानोरा तालुक्यातील मौजा कारवाफा येथील ढिवर समाजाच्या साधना संजय जराते यांचेवर कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रीया करतांना डाॅक्टरांनी हलगर्जीपणा केला. त्यानंतर जिल्हा महिला रुग्णालयात पुन्हा शस्त्रक्रिया करतांना साधनाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या जबाबदार असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.

आरोग्य मंत्री डॉ.तानाजी जाधव यांच्याकडे केलेल्या तक्रारीत आमदार भाई जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, ८ डिसेंबरला डॉ. धीरज मडावी आणि त्यांच्या पथकाच्या हलगर्जीपणामुळे तब्बेत खालावल्याने साधनावर १० डिसेंबरला शासकीय महिला रूग्णालय,गडचिरोली येथे डॉ. माधुरी किलनाके यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा शस्त्रक्रिया करताना साधना जराते या २३ वर्षीय महिलेचा दुदैवी मृत्यु झाला. व त्यांची १ आणि ४ वर्षाची मुले पोरकी झालीत. असे असतांनाही डॉ. माधुरी किलनाके यांनी नातेवाईकांना जवळपास अडीच तास या बाबतची माहिती दिली नाही. तसेच मृत्यूची घटना उघडकीस येवूनही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दोषी डॉक्टरांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

डॉ. दावल साळवे यांच्या कार्यकाळात शेकडो बालमृत्यू आणि मातामृत्यू झाल्याची प्रकरणे गडचिरोली जिल्ह्यात केवळ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झालेली असून त्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची बेजबाबदार कार्यपध्दी कारणीभूत आहे. साधना संजय जराते हिच्या त्यामुळे ते सुद्धा मृत्यूस कारणीभूत असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा महिला रूग्णालयाच्या डॉ. माधुरी किलनाके, शस्त्रक्रीया करणारे डॉ. धीरज मडावी यांना शासनाने तडकाफडकी निलंबीत करून त्यांचेवर हत्येचा फौजदारी गुन्हा दाखल करावा. आणि मृतक साधना जराते हिच्या कुटुंबास आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणीही आमदार भाई जयंत पाटील यांनी केली आहे.

Previous articleध्वजदिन 2023 निधी संकलन शुभारंभ व माजी सैनिक मेळावा;
Next articleगडचिरोली महिला रुग्णालयाच्या वाढीव १०० बेड रुग्णालयास मंजुरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.