Home जळगाव मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

102

आशाताई बच्छाव

IMG_20231213_062414.jpg

जागतिक मानवाधिकार दिन’ निमित्त अनु. जाती नवबाैध्द
मुलांची शासकीय निवासी शाळा, चाळीसगाव येथे शिबीर संपन्न’

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशाप्रमाणे दि.१०/१२/२०२३ रोजी ‘जागतिक मानवाधिकार दिन’ निमित्त तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव
आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग संचलित अनु. जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगाव यांचे संयुक्त विद्यमाने अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती चाळीसगाव तथा दिवाणी न्यायाधीश एन.के.वाळके यांचे अध्यक्षतेखाली शिबीर घेण्यात आले.
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले. शिबीरात अनिल पगारे तालुका समन्वयक समाज कल्याण जळगाव यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. महेंद्र कुमावत सहाय्यक शिक्षक अनु. जाती नवबाैध्द मुलांची शासकीय निवासी शाळा यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
रमेश पोतदार यांनी जागतिक मानवाधिकार दिनावर कविता सादर केली. सचिनकुमार दायमा यांनी ‘पॉक्सो’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. देवेश दिपक पवार यांनी ‘दिव्यांग व्यक्तींचे हक्क अधिनियम २०१६’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच न्यायाधीश एन.के.वाळके यांनी आपले अध्यक्षीय भाषणात ‘जागतिक मानवाधिकार दिन’ या विषयावर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षक ज्ञानेश्वर लिंगायत आणि इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमास परिश्रम डी.के.पवार वरिष्ठ लिपीक यांनी घेतले. दिलीप परदेशी गृहपाल यांनी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केेले.

Previous articleचाळीसगावात डॉक्टरची कार नेली चोरून
Next articleलासलगाव येथे संघर्ष योद्धा स्व. गोपीनाथ मुंडे यांना भाजपा मंडला च्या वतीने अभिवादन— दैनिक युवा मराठा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.