Home जळगाव बैठकीत विद्रोही मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदी गणेश निकम

बैठकीत विद्रोही मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदी गणेश निकम

110

आशाताई बच्छाव

IMG_20231211_204857.jpg

बैठकीत विद्रोही मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष पदी गणेश निकम

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- अमळनेर येथे 3 व 4 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 18 वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची भूमिका गाव पातळीवर जावून समजावून सांगण्याचा निर्णय चाळीसगाव येथे स्थानिक नियोजन समितीचीे बैठक रविवार 10 डिसेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.
बैठकीत गोकुळ पाटील यांची अध्यक्षपदी तर गणेश निकम यांची कार्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच आदिवासी साहित्यिक सुनील गायकवाड यांची सचिव पदी निवड करण्यात आली.
बैठकीत विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची भुमिका गाव पातळीवर समजावून सांगणे, आर्थिक निधी उभारण्यासाठी आवाहन करणे आदी विषयांवर विचार विनिमय करण्यात आला. बैठकीत मुकेश नेतकर, गणेश निकम, सुनील गायकवाड, अशोक जाधव,जवराळे विकी, गोकुळ पाटील, प्रा गौतम निकम यांनी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचलन मुकेश नेतकर यांनी केले तर गणेश निकम यांनी आभार मानले.

Previous articleचाळीसगावात जनजागृतीसाठी 34 इव्हीएम मशिन दाखल
Next articleविकसित भारत संकल्प यात्रा” या मोहिमेच्या रथाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते आज चांदसणी ता. चोपडा येथे शुभारंभ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.