Home जळगाव केळी पिक विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार…

केळी पिक विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार…

113

आशाताई बच्छाव

IMG_20231211_082641.jpg

केळी पिक विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार…
—————————
खासदार उन्मेश दादा पाटील यांची माहिती….

जळगाव प्रतिनिधी विजय पाटील- केळी पिक विमा धारक समस्याग्रस्त शेतकऱ्यांना विमा बाबत सोमवारी लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा बारा टक्के विलंबा शुल्का सहित नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल.यासाठी लवकरच केळी पिक विमा कंपनी विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना दिली आहे.
जळगाव जिल्ह्यात गाजत असलेल्या हवामानावर आधारित फळ पिक विमा (केळी विमा) प्रश्नाबाबत खासदार उन्मेश पाटील यानी आज अजिंठा विश्रामगृह या ठिकाणी केळी पिक विमा धारक समस्याग्रस्त शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती.
सदरील बैठकीस जळगाव जिल्ह्यातील 150 ते 200 शेतकरी उपस्थित होते. या बैठकीवेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री.शिंदे, कृषि अधिकारी अमित भामरे, एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडियाचे चंद्रदीप पवार, केळी तज्ञ डॉ.सत्वशील पाटील,भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गोपाळ भंगाळे, मार्केट संचालक मिलिंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यातील पात्र असलेल्या 53951 शेतकऱ्यांना अजून पर्यंत पिक विमा नुकसान भरपाई मिळालेली नसून सदरची रक्कम मंजूर असल्यावर देखील विमा कंपनी हेतू पुरस्कारपणे विमा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तात्काळ नुकसान भरपाई जमा झालेल्या शेतकऱ्यांची बँक निहाय यादी तसेच प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची यादी तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच राज्य सचिव (कृषि) यांनी दि.22 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित केलेल्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार 11360 शेतकरी ज्यांचे विमा काढलेले क्षेत्र हे प्रत्यक्षात केळी लागवड केलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त असून अशी शेतकऱ्यांना व 1883 पडताळणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे बाबतचे आदेश दिले होते
यावर विमा कंपनीने काय कार्यवाही केली हा प्रश्न उपस्थित केला असता विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना कुठलेही उत्तर देता न आल्याने *खासदारांनी संताप व्यक्त केला*. तसेच याबाबत सोमवारी लेखी स्वरूपात कळवावे अन्यथा बारा टक्के विलंबा शुल्का सहित नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल असे विमा कंपनीस ठणकावले
तसेच विमा कंपनीने शासनास सादर केलेल्या सॅटॅलाइट इमेज व MRSAC अहवाल नुसार 10619 शेतकरी ज्यांनी केळी पिक नसताना पिक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांचे सर्व प्रस्ताव विमा कंपनीने रिजेक्ट केले असून यामध्ये प्रत्यक्ष केळी लागवड केलेले शेतकऱ्यांना देखील वगण्यात आल्याचे बाप खासदारांना पाटील यांनी विमा कंपनी व कृषी विभागाच्या निदर्शनासमन दिली.
याबाबत बोलताना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी भादली खू. या गावातील शेतकऱ्यांचे प्रमुख पिक केळी असून 95 टक्के पेरणीला एक क्षेत्रावरील केळीची लागवड करण्यात येत असते परंतु विमा कंपनीने सादर केलेल्या सॅटॅलाइट इमेज अहवालानुसार गावातील 98 टक्के शेतकऱ्यांचे विमा दावे रिजेक्ट करण्यात आलेले असून आज देखील प्रत्यक्ष शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी केल्यास त्या ठिकाणी देखील केळी पिक उभे आहे.
यावर विमा कंपनीने सादर केलेल्या सॅटॅलाइट इमेज व MRSAC ची माहिती मागितली असता कंपनीकडे कुठलीही माहिती उपलब्ध झाली नाही. यावर कंपनीच्या धोरणांविरुद्ध, शेतकऱ्यांना हेतू पुरस्करपणे त्रास देण्याच्या प्रकाराविरुद्ध सर्व शेतकऱ्यांसोबत चर्चा करून
मा. उच्च न्यायालयात कंपनीविरुद्ध सर्व कागदपत्रांची पूर्तता करून दावा दाखल करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. बैठकीच्या यशस्वीतेसाठी भादली लोकनियुक्त सरपंच किशोर पाटील, अमोल बोरसे, शेतकरी संघटनेचे किरण गुजर, समाधान पाटील,चंद्रकांत पाटील जळके आदी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

Previous articleराज्यस्तरीय सल्लागार समितीमध्ये प्रा. बी. आर. कत्तुरवार सर यांची निवड
Next articleरोटरी चा “उडान” प्रकल्प खरोखर विद्यार्थिनींना नवीन पंख देणारा – अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे….
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.