Home अमरावती जगद्गुरु श्रीमद रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार १२ डिसेंबरला जन्मोत्सव साजरा...

जगद्गुरु श्रीमद रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार १२ डिसेंबरला जन्मोत्सव साजरा होणार याप्रसंगी कौंडण्यपूर येथे ४०० पेक्षा जास्त संतांची उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा होणार.

150

आशाताई बच्छाव

IMG_20231211_081517.jpg

जगद्गुरु श्रीमद रामानंदचार्य स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार १२ डिसेंबरला जन्मोत्सव साजरा होणार याप्रसंगी कौंडण्यपूर येथे ४०० पेक्षा जास्त संतांची उपस्थितीत जन्मोत्सव सोहळा साजरा होणार.
————.
दैनिक युवा मराठा

पीएन देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती/(कौंडण्यपूर)
अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूर येथे रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या ठिकाणी श्रीमद जगद्गुरु रामानंदचार्य स्वामी जगद्गुरुश्री राजेश्वर माऊली सरकार यांचा जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे विदर्भ रुक्मिणी पीठ १२ डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. या रोजी जगद्गुरु राजेश्वर माऊली सरकारच्या जन्मोत्सवप्रसंगी आजपासूनच भक्तांचे जनसागर व संतांचे आगमन झालेले आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ डिसेंबरला १०ते१२ वाजताच्या दरम्यान भक्तिमय रसरंग संगीतमय उत्साहात गायक कृष्ण चक्रवर्ती यांच्या हस्ते सुरुवात होणार आहे.१२ते१ वाजता सकाळी श्रीमद जगद्गुरु सद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार यांचे वैदिक विधिपूर्वक पाद्यपूजा व त्यांचे अमृतवाणीतून उद्बोधन चा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. दुपारी २ वाजल्यापासून भक्तांचे आगमन पर्यंत महाप्रसाद तमाम भक्तगणांना व संतांना याप्रसादाचा लाभ मिळणार आहे. 12 डिसेंबरला सकाळी आठ वाजता श्री रुक्मिणी रथयात्रा नाम संकीर्तन श्री क्षेत्र अंबिकापूर कौंडण्यपुरा श्री रुक्मिणी वल्लभ कृष्ण हरीच्या गजरात टाळ मृदंग सह भक्तांचा जनसागर सहित व संतासहित मिरवणूक काढणार आहे या मध्ये सर्व भावी भक्त तसेच दिंडी पथक सहभागी होतील. या दिवशी भावी भक्तांच्या सोबतच भरपूर संख्येने गावकरी मंडळी भक्त मंडळी या आनंदाच्या पर्वावर येतातच, परंतु आकर्षण असते संपूर्ण भारताचे अनेक राज्यातून येणारे संत महंत मंडलेश्वर आधी महामंडलेश्वर विशेष करून या जन्मस्थळ श्रीमद जगद्गुरु स्वामी श्री राजेश्वर माऊली सरकार यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी येणारे ४00 पेक्षा जास्त संत मंडळीची उपस्थित कार्यक्रमाचा भावी व दिव्यात वाढणार आहे. श्री रुक्मिणी पीठ आयोजन समितीचे सर्व भाविक भक्तांचा मंगल सोहळ्यात लाभ घेण्याचे कौंडण्यपूर येथील गावकऱ्यांनी व या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आव्हान केलेले आहे.