Home उतर महाराष्ट्र शेवगाव खंडोबा नगर येथे ११ डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहास होणार आरंभ—-

शेवगाव खंडोबा नगर येथे ११ डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहास होणार आरंभ—-

145

आशाताई बच्छाव

IMG_20231129_172257.jpg

शेवगाव खंडोबा नगर येथे ११ डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताहास होणार आरंभ—-

दैनिक युवा मराठा लक्ष्मण आवारे चांदवड

श्री खंडोबा मंदिर खंडोबानगर ,शेवगाव (अ नगर) येथे 11 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती या रामायणाचार्य ह भ प राम महाराज उदागे यांनी दिली आहे ‌‌.
ह भ प रामायणाचार्य श्री राम महाराज उदागे यांच्या मार्गदर्शनाने 11 डिसेंबर २०२३ पासून प्रारंभ होत आहे . भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून ,या सप्ताह काळात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रवचनकार व किर्तनकारांची प्रवचन व किर्तन सेवा होणार आहे . सप्ताहामध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन केले असून ह भ प श्री रावसाहेब महाराज सोनवणे हे पारायण नेतृत्व करणार आहेत . सोमवार दिनांक ११/१२)२०२३ रोजी महंत ह भ प श्री कैलासगिरीजी महाराज सावखेडा , मंगळवार दि १२/१२/२०२३ भागवताचार्य ह भ प श्री गोविंद महाराज जाटदेवळेकर, बुधवार दि १३/१२/२०२३ रोजी दादा महाराज वायसळ . गंगापूर , गुरुवार दि १४/१२/२०२३ ह भ प श्री सोमनाथ महाराज कराळे श्री क्षेत्र पैठण , शुक्रवार दि १५/१२/२०२३ ह भ प महंत श्री उद्धव महाराज मंडलिक श्री क्षेत्र नेवासा , शनिवार दि १६/१२/२०२३ ह भ प विनोदाचार्य श्री सुधाकर महाराज वाघ श्री क्षेत्र पैठण , रविवार दि १७/१२/२०२३ भागवताचार्य साध्वी तुलसी दीदी ,सोनई . तसेच सोमवार दिनांक १८ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत रामायणाचार्य ह भ प श्री राम महाराज उदागे यांच्या अमृततुल्य वाणीतून काल्याची किर्तन सेवा होईल व नंतर महाप्रसाद होईल .दरवर्षी या सप्ताहामध्ये खंडोबानगर व परिसरातील सर्वच भाविक या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे शिस्तबद्ध आणि सर्वच कार्यक्रम वेळेवर संपन्न होतात म्हणून ह्या सप्ताहाचे परिसरामध्ये नावलौकिक आहे . तरी याही वर्षी सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा ही खंडोबा भजनी मंडळाच्या वतीने सर्वांना नम्र विनंती . स्थळ – खंडोबा मंदिर खंडोबानगर शेवगाव .

Previous articleजिल्हाधिकारी कार्यालयावर ९ डिसेंबरला उलगुलान महामोर्चा
Next articleअवकाळी पावसामुळे व गारपीट ग्रस्तांना शासनाने तातडीने मदत देण्याची अँड रविंद्र नाना पगारे यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.