Home अमरावती अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्र द्वारे १९ प्राध्यापकांनी बळकवाल्या नोकऱ्या.

अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्र द्वारे १९ प्राध्यापकांनी बळकवाल्या नोकऱ्या.

207

आशाताई बच्छाव

IMG_20231122_145709.jpg

अमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्र द्वारे १९ प्राध्यापकांनी बळकवाल्या नोकऱ्या.
—————
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती विभागीय संपादक.
अमरावती.
महाविद्यालयात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक पदासाठी राज्यपात्रता परीक्षा (सेट) अथवा राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) आवश्यक आहे. मात्र, काही जणांनी बनावट नेट-सेट प्रमाणपत्राच्या आधारे सहयोगी प्राध्यापक पदाची नोकरी बळकवल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ सलग्न महाविद्यालयात तब्बल १९ प्राध्यापकांचे नेट-सेट प्रमाणपत्र बनावट असल्याची माहिती पुढे आली आहे. यासंदर्भात केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाचे पत्र२७ ऑक्टोंबर२०२३ रोजी अमरावती विद्यापीठ ला प्राप्त झाले आहे. माहितीनुसार वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथील कला विज्ञान महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक तथा सहयोग प्राध्यापक सुरेंद्र चव्हाण यांनी डिसेंबर २००४ मध्ये टी४३२६८७ फिजिकल एज्युकेशन नेट विषयाचे प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळवली होती. तथापि, चव्हाण यांची नेट प्रमाणपत्र बनावट असल्याची तक्रार राजभावनाकडे करण्यात आली होती. विद्यापीठ सुरेंद्र चव्हाण यांच्या नेट प्रमाणपत्राच्या चौकशी बाबतची माहिती युजीसी कडे अहवाल रूपात पाठविला. यूजीसी ने चव्हाण यांच्या नेट इत्यादी प्रमाणपत्राचे पडताळणी हे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे पत्र यूजीसी ने अमरावती विद्यापीठ ला पाठविले आहे. यूजीसीच्या पत्रानुसार एका सहयोग प्राध्यापकांची नेट प्रमाणपत्र बनावट असल्याचे कळविण्यात आले आहेत साधारणतः अन्य १६ जणांची यादी आहे. त्यानुसार नेट-सेट प्रमाणपत्राची महाविद्यालयाकडून माहिती मागितली जाणार आहे. असे डॉ. तुषार देशमुख पूल सचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांनी माहिती दिली आहे.

Previous articleबिग बजेट’शासन आपल्या दारी ‘ स्थगीत; लवकरच नवीन तारीख, प्रशासनाची माहिती.
Next articleपहेला येथे अपघात झालेल्या वानर (काळतोंड्याला) वन विभागाच्या रेस्क्यू टीम मुळे जीवनदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.