Home जळगाव फटाके फोडण्याच्या कारणातून पिंपरखेड तांडा येथे हाणामारी

फटाके फोडण्याच्या कारणातून पिंपरखेड तांडा येथे हाणामारी

189

आशाताई बच्छाव

IMG_20231122_062628.jpg

फटाके फोडण्याच्या कारणातून पिंपरखेड तांडा येथे हाणामारी

चाळीसगाव प्रतिनिधि विजय पाटील- घरासमोर अंगणात फटाके फोडण्याच्या कारणातून तालुक्यातील पिंपरखेड तांडा येथे हाणामारी होवून हातोडी, फायटर, रॉडचा वापर करण्यात आला. या हाणामारीत एकाच्या गळ्यातील सोन्याची पोत तर दुसऱ्याच्या खिशातील 5 हजार रूपये काढून घेतले.याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, पिंपरखेड येथे दि.13 रोजी रात्री 9.30 वाजता फिर्यादी सिताराम ओंकार चव्हाण यांच्या घरासमोर शांतीबाई जाधव हिची मुले फटाके फोडत होती.यावरून फिर्यादीची आई बोलण्यास गेली असता त्यातून भांडण झाले.
यावेळी सणाच्या वेळी भंाडण करून नका असे सिताराम चव्हाण हे सांगण्यास गेले असता संशयित आरोपींना त्याचा राग आला. आरोपीतांनी गैरकायदा मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात घुसून त्यांना तसेच त्यांची आई, वडिल, भाऊ व पत्नी अशांना शिवीगाळ करून लोखंडी रॉड, फायटरने मारून गंभीर दुखापत केली.तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली.
या मारामारीच्या बहाण्याने फिर्यादीच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच शर्टच्या खिशातील 5 हजार रूपये काढून घेतले.
याप्रकरणी सिताराम ओंकार चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून
संशयित शांतीबाई जाधव,सुनील जाधव, राहूल जाधव, दयाराम जाधव, विकास जाधव, विनोद राठोड सर्व रा. पिंपरखेड तांडा व अन्य एक अशा सात जणांच्या विरोधात 20 रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला भादंवि कलम 143,147,148,149, 326,327, 323, 504, 452 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

Previous articleपश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Next articleअल्पवयीन मुलीशी लग्न केले-सासरच्या लोकांविरूद गुन्हा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.