Home नाशिक व-हाणेतील त्या गावगुंडांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी चांदवड ला निवेदन दाखल

व-हाणेतील त्या गावगुंडांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी चांदवड ला निवेदन दाखल

404

आशाताई बच्छाव

IMG_20231117_061450.jpg

व-हाणेतील त्या गावगुंडांवर
कठोर कारवाईच्या मागणीसाठी चांदवड ला निवेदन दाखल
(लक्ष्मण आवारे)
चांदवड – युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व युवा मराठा न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांच्या वर मालेगाव पंचायत समिती परिसरात व-हाणेतील गावगुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ काल चांदवड येथे महासंघाचे तालुकाध्यक्ष सुनील गांगुर्डे व तालुका उपाध्यक्ष पवन प्रजापत आणि प्रविण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत चांदवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चौधरी यांना तर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना निवेदन देण्यात येऊन या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला व व-हाणे गावी सुरू असलेल्या पाणपोई जागेच्या वादातून हा हल्ला करण्यात आलेला असून त्यामुळे या हल्लेखोर गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
.……. चौकट……..
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बांधवांवर दिवसाढवळ्या असा प्राणघातक हल्ला होत असेल ते कदापि खपवून घेतले जाणार नाही व युवा मराठा महासंघाचे वतीने महाराष्ट्र भरात कार्यरत असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांत या घटनेचा निषेध म्हणून व गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आजपासून निवेदने दाखल करतील आणि लवकरच याबाबत मोठे आंदोलन उभे करण्यासाठी बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल – ज्ञानेश्वर पाटील दादळे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा मराठा महासंघ

Previous articleअखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व हरिकीर्तन
Next article40 गावातील नागरिकांकरिता एक दिवस समाजासाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन। जिल्हा शल्य चिकिस्तक डॉ.प्रमोद खंडाते
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.