Home जळगाव खासदार उन्मेष पाटील यांनी रुग्णाला तात्काळ उपलब्ध करून दिले आयुष्यमान भारत योजनेचे...

खासदार उन्मेष पाटील यांनी रुग्णाला तात्काळ उपलब्ध करून दिले आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड

157

आशाताई बच्छाव

IMG_20231115_063820.jpg

खासदार उन्मेष पाटील यांनी रुग्णाला तात्काळ उपलब्ध करून दिले आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – शहरातील शास्त्री नगर मधील वृत्तपत्र विक्रेत्याला उपचारासाठी लागणारे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड खासदार उन्मेष पाटील यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्याने रुग्णाला आता योजनेतून उपचार मिळणार आहेत.
दीपावलीनिमित्त चाळीसगाव येथील जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी संवाद साधण्यासाठी खासदार उन्मेष पाटील उपस्थित असताना शास्त्रीनगरातील शिनकर भगिनी आपली समस्या घेऊन भेटीला आल्या त्यांचे पती वृत्तपत्र विक्रेता अमोल शिनकर यांना ब्रेन ट्यूमर झाला होता.
प्राथमिक उपचार डॉ. राहुल वाघ यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. त्यांचेकडे आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड नसल्याने पुढील उपचार कसा करावा ही समस्या होती. तात्काळ वाल्मीक महाले यांना बोलवून त्यांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड उपलब्ध करून दिले
त्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक येथे जाणे शक्य होणार आहे. अमोल शिनकर यांना आयुष्यमान भारत कार्ड दिल्यानंतर त्यांना व त्यांच्या परिवाराला खऱ्या अर्थाने मदत केल्याचा आनंद झाल्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले.

Previous articleतहसील कार्यालयाला दीपावलीची सुटी असूनही नायब तहसीलदार यांनी दिला उत्पन्नाचा दाखला
Next articleपाडव्याच्या सणादिवशी दुध दरवाढीसाठी रयत क्रांती संघटनेचे खर्डा भाकरी आंदोलन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.