Home अमरावती पंधरा हजार रुपयांची मदत दिवाळी पुर्व जमा करण्याची मागणी

पंधरा हजार रुपयांची मदत दिवाळी पुर्व जमा करण्याची मागणी

208

आशाताई बच्छाव

IMG_20231108_171919.jpg

अमरावती,(गजानन जिरापूरे )-आरोग्य विभाग जिल्हा परिषद अमरावती च्या वतीने दुर्धर आजारी रुग्णांना दिली जाणारी पंधरा हजार रुपयाची आर्थिक मदत दिवाळीपूर्वी सर्व रुग्णांच्या खात्यावर त्वरित जमा करावी व त्यांची दिवाळी साजरी करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे यांनी जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अविशांत पांडा डॉक्टर असोले साहेब यांना प्रत्यक्ष भेटून केली आज दिनांक 7/11/2023 रोजी विविध गावातील सरपंच व पदाधिकारी यांना घेऊन सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना भेटून निवेदन सादर केले याप्रसंगी विर्शी येथील सरपंच अमित कुचे सामाजिक कार्यकर्ते श्री अनुहल्ला खान,अखिल भारतीय मराठा महासंघाचे अमरावती जिल्हा आधक्ष विश्वंभर मारके, विधानसभेचे युवक काँग्रेसचे महासचिव सौरभ कोहळे, तसेच शेखर अवघड, पूर्ण नगरची उपसरपंच उमेश महिंगे, नव निर्वाचित बैलमारखेड सरपंच राजुभाऊ सनके व आदी पदाधिकारी उपस्थित होते