Home जळगाव पाटणा देवी दर्शनाला जाण्यासाठी पुल नाही…. पुरातन विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत...

पाटणा देवी दर्शनाला जाण्यासाठी पुल नाही…. पुरातन विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत आहे – सरपंच नितीन पाटील..

112

आशाताई बच्छाव

IMG-20231004-WA0133.jpg

पाटणा देवी दर्शनाला जाण्यासाठी पुल नाही….
पुरातन विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत आहे – सरपंच नितीन पाटील..

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- तालुक्यातील पाटणा येथे भव्य असे पुरातन मंदिर असून याठिकाणी घनदाट जंगल असल्याने भाविक व पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात मात्र बारा वर्षापासून पाटणादेवी मंदिरावर जाण्यासाठी नदीवर पूल नाही यामुळे नदीला पूर आल्यास भाविकांना दर्शनासाठी जाता येत नाही पुरातन विभाग मुद्दाम याकडे दुर्लक्ष करत आहे का असा सवाल पाटणा गावचे सरपंच नितीन पाटील यांनी उपस्थित केला आहे.
मागील वर्षी आमदार मंगेश दादा यांनी हे बघितल्यानंतर यासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु पुरातन विभागाने याला मंजुरी दिली नाही आणि ते स्वतःही पूल करत नाही यामागे त्यांचा काय उद्देश आहे असे ही त्यांनी म्हटले आहे या ठिकाणी भाविक मेले पाहिजेत असे आता आम्हाला पाटणा परिसरातील लोकांना वाटायला लागलेले आहे आम्ही पाटणा ग्रुप ग्रामपंचायत आमदार मंगेश दादा यांना भेटलो त्यांनी परत पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु पुरातन विभागाच्या अडमुठ धोरणामुळे परवानगी मिळत नाही आणि पुरातन विभाग स्वतःही करत नाही फक्त देवी जवळील पैसा सोने नाणे साड्या ओटी जमा करण्यासाठी येतात आणि निघून जातात आम्ही गावातील नागरिकांनी कुठलीही जीवित हानी होऊ नये म्हणून छोटया व तुटलेल्या पुलावर लोकांना जाण्यासाठी दोर बांधलेले आहेत सिमेंट बोरी भरून ठेवलेली आहे परंतु त्या वाहून जातात पुरातन विभाग याकडे कधी लक्ष देणार मोठी जीवित हानी झाल्यावर लक्ष देतील काय असे सर्व महाराष्ट्रातील भाविकांना आता वाटायला लागलेले आहे. हा मंदिराकडे जाणारा पूल होऊ नये म्हणून पुरातन विभागातील काही अधिकाऱ्यांचा स्वार्थ आहे का असेही नितीन पाटील यांनी सांगितले आहे

Previous articleचाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती जाहीर…
Next articleशिक्षक मतदारसंघासाठी शिक्षकांनी नव्याने नाव नोंदविण्याचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे आवाहन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.