Home पुणे आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे……शिवाजीराव माने

आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे……शिवाजीराव माने

129

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0115.jpg

आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे……शिवाजीराव माने
पुणे ब्युरो चिफ उमेश पाटील
सांगवी:- आपल्या निरोगी आणि स्वस्थ जीवनासाठी स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर. स्वच्छ्ता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे . स्वच्छता असे जिथे, आरोग्य वसे तिथे. म्हणुन प्रत्येक विद्यार्थ्याने स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन आपले घर, परीसर स्वच्छ ठेवला पाहिजे तरच आपले आरोग्य चांगले राहिल त्याबरोबरच देशाची विकास व शान ही वाढेल असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. सौ शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, शिशुविहार, नूतन माध्यमिक विद्यालय, व सुंदरबाई भानसिंग हुजा गुरू गोविंद इंग्लिश मिडीयम स्कूल सांगवी आयोजीत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमीत्त स्वच्छता अभियान कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले. महात्मा गांधीजी यांनी आपल्याल स्वच्छतेचा मंत्र दिला.आणि लाला बहादुर शास्त्री यांनी देशाचे रक्षण करायचे असेल तर जवान आणि किसान यांना आपण जपलं पाहिजे असे ते म्हणाले त्यांनी विद्यार्थ्याना स्वच्छतेचे महत्व काय आहे हे समजावून सांगितले. प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या घराबरोबर सार्वजनिक ठिकाणे व परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. हे आपले कर्तव्य आहे याची जाणीव प्रत्येकाला असायला हवी असे ते म्हणाले. आज सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मन लावुन शाळेच्या परिसराची व स्वच्छता गृहाची स्वच्छ्ता केली. सर्व विद्यार्थी उस्पूर्त पणे स्वच्छता करतं होती. या अभियानात सर्व माध्यमाच्या एकुण ४५० विध्यार्थी व ३० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.या प्रसंगी शिक्षक पालक संघसदस्य, शाळा व्यवसथापन समिति सदस्य, संस्थेचे पदाधिकारी सदस्य , पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक दत्तात्रय जगताप यांनी केले व आभार सप्निल कदम यांनी केलं