Home वाशिम पिंपळगाव ( ईजारा ) येथे घाणीचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

पिंपळगाव ( ईजारा ) येथे घाणीचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

369

आशाताई बच्छाव

IMG-20231002-WA0026.jpg

पिंपळगाव ( ईजारा ) येथे घाणीचे साम्राज्य ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

मंगरूळपीर प्रतिनिधी: रितेश गाडेकर युवा मराठा न्युज

मंगरूळपिर तालुक्यातील पिंपळगाव ईजारा येथे घाणीचे साम्राज्य, पिंपळगाव येथील गावाची लोकसंख्या जवळपास दीड ते दोन हजारपर्यंत पोहचली आहे.मात्र गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन नियमीत साफसफाई होत नसल्यामुळे गावातील मुख्य परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. रोड वरील घाणीमुळे त्या परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागला असुन त्या परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने साडपाण्याचे डबके साचले आहे यातून दुर्गधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे,आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत गावात साफसफाई नियमित करणे गरजेचे आहे नियमित गटारी काढणे पिण्याच्या पाण्यात टि.सी.एल पावडर वापरणे काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज असेल ते दुरुस्त करणे व गावातील सर्वच भागात स्वच्छता अभियान राबवण्यासह गावात डासांचा नायनाट होईल, अशी धुरळणी सह फवारणी करणे गरजेचे आहे तसेच महिला शौचालयाजवळ देखील साफसफाई करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा पिंपळगाव ईजारा येथील नागरिकांन कडून करण्यात येत आहे.