आशाताई बच्छाव
वारकरी मंच येवला तालुका महिला कार्यकारणी जाहीर
तालुका अध्यक्षपदी मीनाताई जठार, सरचिटणीसपदी सौ प्रिया गाडे तर सहसचिव सौ योगिता चव्हाण
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
वारकरी संप्रदायाच्या सेवा-शिक्षण-प्रचार-प्रसार वारकरी मंच या वारकरी मंच महाराष्ट्र राज्य येवला तालुका महिला कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून संत विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याची तळमळ पाहता वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे-देशमुख आळंदीकर यांच्या आदेशानुसार , प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर वनसगाव यांच्या शिफारशीनुसार, नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा सौ सवितामाई पगार मनमाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वारकरी मंच जिल्हा संघटक सरपंच सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला यांच्या सुचनेनुसार येवला तालुका महिला अध्यक्षा मीनाताई बाबासाहेब जठार सायगाव, समन्वयक सौ वनिता राजेंद्र पाटील येवला तर कार्याध्यक्ष म्हणून सौ सारीका ऋषिकेश कोटमे कोटमगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती महिला जिल्हा समन्वयक सौ सरीताताई विलास नागरे मातुलठाण यांनी दिली आहे.
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य– येवला तालुका महिला कार्यकारिणी पुढीलप्रमाणे —
तालुका अध्यक्ष -सौ मीनाताई बाबासाहेब जठार (सायगांव), उपाध्यक्ष -सौ मंगल बाबुराव जगताप (देशमाने), कार्याध्यक्ष- सौ सारीका ऋषिकेश कोटमे- (कोटमगाव), सह कार्याध्यक्ष- सौ वनिता ज्ञानेश्वर पवार (अनकुटे) येवला, संपर्कप्रमुख – कोमल प्रविण ढमाले (आड सुरेगाव), संघटक- श्रीमती शलाका भुजबळ -देखने (भाटगाव) येवला, समन्वयक –सौ वनिता राजेंद्र पाटील (येवला), प्रसिद्धी प्रमुख -सौ सुरेखा योगेश नागरे (मातुलठाण), सरचिटणीस -सौ प्रिया विक्रम गाडे-विठ्ठलनगर (येवला), सचिव –सौ निर्मला शिवाजी खैरे (नांदुर), सहसचिव सौ योगिता राजेंद्र चव्हाण गुजरखेडे, तालुका सदस्य -सौ मुक्ताबाई धोंडीराम वाघ (बल्हेगाव), सौ कविता उमेश जाधव (सुकी) आदींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे.
वरील सर्व नियुक्त्या झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश कोंडे महाराज देशमुख आळंदीकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के संभाजीनगर , प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे निफाड, प्रदेश संघटक शरद आढाव पाटील बुलढाणा, वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे, नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष सौ सवितामाई पगार मनमाड, जिल्हा उपाध्यक्ष महिला सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, जिल्हा उपाध्यक्ष उमेश केशव चव्हाण दरसवाडी,महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील ममदापूर, संघटक दत्ता महाराज जाधव वागळुदकर, महिला जिल्हा समन्वयक सौ मनिषा ताई भोर निफाड, जिल्हा समन्वयक हभप नंदकिशोर महाराज दौंड तळवाडे नांदगाव, जिल्हा महिला संघटक सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला, जिल्हा सचिव हभप सौ ऋतुजा ताई रवींद्र दरेकर चांदवड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सौ वैशाली ताई शिरोळे सिन्नर, जिल्हा सरचिटणीस सौ शारदा राजेंद्र गवळी (पुणतांबा) नाशिक आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.






