Home नाशिक मालेगाव शहर येथे एकता मंडळाची श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात...

मालेगाव शहर येथे एकता मंडळाची श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले

183

आशाताई बच्छाव

IMG-20230929-WA0031.jpg

मालेगाव शहर येथे एकता मंडळाची श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले

गणेश पाटील – मालेगाव शहर व तालुक्याच्या सर्व गणेशभक्तांच्या कायम स्मरणात अशी एकता मंडळाची श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते मालेगाव सटाणा नाका सुनील आबा गायकवाड, एकता मंडळ यांच्या तर्फे भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यात रशियन कार्निवल बॅंड,इजिप्त तनुरा डान्स, पुणेरी ढोल पथक, नाशिक ढोल पथक, कोळी ग्रुपनृत्य लेझीम पथक, बाहुबली हनुमान, साक्षात विराट भोलेनाथ , झांज व डमरू पथक, अघोरी पथक, शौर्य पथक, बॅालीवुड पथक, कोल्हापुरी हलगी पथक, आदिवासी पथक, हरी नामाचा गजर,अनेक प्रांतातून व महाराष्ट्राच्या विविध भागातून आपल्या संस्कृतीचे दर्शन होईल अशी आकर्षक पथके यात सामील केली होती.अनेक अशी पथके मिरवणूकी मध्ये आमंत्रित करण्यात आली होती,मिरवणुकीचे आयोजन सटाणा नाका येथून सायंकाळी पाच वाजता प्रारंभ झाली व गणेशकुंड रामसेतू पूल येथे रात्री बारा वाजे नंतर एकता मंडळाच्या गणपती बाप्पाच्या मिरवाणुकीची सांगता करण्यात आली या ऐतिहासिक मिरवणुकीचे संस्थापक सुनील आबा गायकवाड यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यां सोबत या मिरवणुकीच्या कार्यक्रमाची सांगता व मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली, व शेवटी मिरवणुकीची सांगता करण्यात आली व असंख्य नागरिकांनी गणपती बाप्पाच्या घोषणा देऊन बाप्पाला निरोप देण्यात आला,

Previous articleचाळीसगाव येथे ईदमिलादुनबी उत्साहात साजरी.
Next articleगणपती बप्पा मोरया…, पुढच्या वर्षी लवकर या… म्हणत आपल्या लाडक्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.