आशाताई बच्छाव
विठ्ठल रखुमाई ग्रुप च्या सौ शारदा ताई गवळीं ची
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला सरचिटणीसपदी नियुक्ती
शारदा गवळी यांच्या सांप्रदायिक कार्याची घेतली वारकरी मंच ने दखल
दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड
विठ्ठल रखुमाई अध्यात्मिक विचार मंच महाराष्ट्र राज्य सदस्य सौ शारदा ताई राजेंद्र गवळी (पुणतांबा) गणेश कृष्ण मंदिर शिवाजीनगर (सातपूर) नाशिक यांची वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा महिला सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती वारकरी मंच प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी दिली आहे .
वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष हभप निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर) यांच्या आदेशानुसार, प्रदेश प्रसिद्धीप्रमुख रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांच्या शिफारशीनुसार, जिल्हा अध्यक्ष शंकरराव छबू कोल्हे नैताळे व महिला जिल्हा अध्यक्ष सौ सवितामाई अशोक पगार (मनमाड), जिल्हा उपाध्यक्ष सौ कमलताई गायकवाड (म्हसरूळ) यांच्या सुचनेनुसार वारकरी संप्रदायाबद्दलची असलेली निष्ठा व भाव लक्षात घेऊन श्री कृष्ण भक्त सौ शारदा राजेंद्र गवळी यांची नाशिक जिल्हा महिला सरचिटणीसपदी नेमणूक करण्यात आली आहे. वारकरी मंच महाराष्ट्र राज्य नाशिक जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे- देशमुख (आळंदीकर), प्रदेश उपाध्यक्ष बाबासाहेब मुरलीधर सोनटक्के, प्रदेश संघटक शरद कैलास अढाव, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पत्रकार रामभाऊ आवारे सर, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष मधुकर महाराज जाधव, कोकण विभाग कार्याध्यक्ष ह भ प नामदेव शंकर पिचूर्ले रत्नागिरी, विदर्भ विभाग कार्याध्यक्ष केशव महाराज भुजाडे , ह भ प राजेंद्र महाराज पाटील,वारकरी मंच नाशिक जिल्हा अध्यक्ष शंकरराव कोल्हे नैताळे, महिला जिल्हा अध्यक्ष सौ सवितामाई पगार मनमाड, जिल्हा उपाध्यक्ष महिला सौ कमलताई गायकवाड म्हसरूळ, जिल्हा उपाध्यक्ष उमेश केशव चव्हाण दरसवाडी,महिला जिल्हा संपर्कप्रमुख सौ पुष्पाताई पवार नागापूर, जिल्हा संपर्कप्रमुख देविदास गुडघे पाटील ममदापूर, संघटक दत्ता महाराज जाधव वागळुदकर, जिल्हा समन्वयक सौ मनीषा दिपक भोर निफाड, हभप नंदकिशोर महाराज दौंड तळवाडे नांदगाव, जिल्हा महिला संघटक सौ सरीताताई नागरे मातुलठाण येवला, जिल्हा महिला सचिव हभप ऋतुजा ताई दरेकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सौ वैशाली ताई शिरोळे गोंदे आदींनी अभिनंदन केले आहे






