Home अमरावती कृषी विभागाने निश्चित केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास मजीप्राची टाळाटाळ.

कृषी विभागाने निश्चित केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास मजीप्राची टाळाटाळ.

173

आशाताई बच्छाव

Screenshot_20230924-160416_WhatsApp.jpg

कृषी विभागाने निश्चित केलेल्या नुकसान भरपाईची रक्कम देण्यास मजीप्राची टाळाटाळ.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी .एन. देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
वझर येथील सापन प्रकल्पातून चांदूरबाजार आणि अचलपूर मधील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत ८३ गावांना पाणीपुरवठा योजना जात आहे या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालया अंतर्गत नेमलेले एजन्सी पी.पी.गोगडयांनी केले.
दुर्लक्षामुळे २९ जुलै रोजी जलवाहिनी नादुरुस्त झाली. परिणामी लाखो लिटर पाणी नजीकच्या अनिल पितळे यांच्या वडूरा गट नं.६० मधील शेतात शिरले. त्यामुळे शेतातील संत्रा व तू या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसान भरपाई बाबत तलाठी यांनी पंचनामा सुद्धा केला होता. मजिप्रा कार्यालयाने कृषी विभागाने नुकसानाचे मूल्यांकन बाबत ४ ऑगस्ट रोजी पत्र देत अहवाल मागितला होता. कृषी विभागाच्या अहवालानुसार अनिल पितळे यांच्या शेतातील संत्र पिकाचे २ लाख ६ हजार रुपये तर तुर पिकाचे१ लाख २६ हजार असे नुकसान झाल्याचे मूल्यांकन पत्र सुद्धा देण्यात आले आहे. तरीही मजिप्रा व कंत्राटदारी हे नुकसान भरपाई देण्यास दीरंगाई करत आहे. अचलपूर तालुक्यात या योजनेचे काम करणारी कॉन्ट्रॅक्टदार एजन्सी पी.पी.गोगड यांनी शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतात जाणाऱ्या रस्त्याचे नुकसान केले असून तालुक्यातील जिल्हा परिषद व बांधकाम विभागाच्या रस्त्याची ही मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शिवाय ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्याचेही नुकसान केले आहे. तरीसुद्धा मजीप्रा व येथील जनप्रतिनिधी या कॉन्ट्रॅक्टदाराला का पाठीशी घालत आहे असा प्रश्न नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामपंचायत पदाधिकारी विचारत आहे. अनिल पितळे यांचे वडूरा शेतशिरावर तील गट नं.६० येथील १.२० हेक्टर वरील संत्रा व तूर पिकाचे नुकसान झाले होते. कारण त्यांच्या शेतात जाऊन गेलेली जलवाहिनी मजिप्रा व लक्षात त्यामुळे चाचणीच्या नावावर ना दुरुस्त होऊन झालेल्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले होते. याबाबत तसा पंचनामा करण्यात आला होता. संबंधी शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण यांना १३ सप्टेंबर रोजी तशी तक्रार नोंदवली होती. परंतु नुकसान भरपाई देण्याला मात्र हे कार्यालय टाळाटाळ करीत आहे.

Previous articleनाशिकमध्ये “युवा मराठा”चे इम्तियाज अतार यांची कर्तबगारी निवेदन देताच रस्त्याची डागडुज्जी सुरु झाली!
Next articleवाहतूक सुरक्षा जागृती काळाची गरज–साईनाथ वीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.