आशाताई बच्छाव
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि) च्या संवाद बैठकीत १४ नवनिर्वाचित सभासदांचा प्रवेश रत्नागिरी,(ब्युरो चीफ सुनील धावडे)
छावा प्रतिष्ठान रत्नागिरी ची संवाद बैठक रत्नागिरी येथे गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी हॉटेल विवा, मारुती मंदिर, रत्नागिरी येथे प्रतिष्ठान चे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या उपस्थित संपन्न झाली.
सभेची सुरुवात छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व दिप प्रज्वलन उपाध्यक्ष सुनिल आग्रे यांच्या हस्ते करुन
झाली. त्यानंतर छावा प्रतिष्ठान रत्नागिरी (रजि) हि सामाजिक संस्था गेली ९ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, आरोग्यविषयक शिबिरे आणि किल्ले संवर्धन क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे त्याबद्दल नविन सभासदांना माहिती देण्यात आली व त्यांचा प्रवेश करुन पदनियुक्ती देण्यात आली. तसेच प्रतिष्ठान ची भविष्यातील दिशा कशी असेल यासंदर्भात माहिती जिल्हा संघटक समीर धावडे यांनी दिली.
या बैठकीमध्ये नवनियुक्त पदाधिकारी व सभासद सौ. राखी रुपेश बने यांची (रत्नागिरी जिल्हा महिला सुरक्षा प्रमुख), प्रथमेश देवेंद्र पवार (रत्नागिरी जिल्हा मिडिया प्रमुख), तसेच सभासद विशाल वसंत कांबळे, निलेश नारायण गावणकर, सुदर्शन राजेंद्र देसाई, निरज सुरेश ठोंबरे, अनिकेत विजय फुटक, धीरेंद्र राजेंद्र गोताड, महेश कृष्णा मांजरेकर, विनोद दत्ताराम मोरे, प्रतिक्षा नारायण शिगवण,पूजा शशिकांत पोतदार, सायली दिनकर पारधी,रुजुता रणजीत लवंडे यांची नियुक्ती संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.
या संवाद बैठकीस छावा प्रतिष्ठान चे सचिव समीर गोताड, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, सल्लागार मोहन पवार, प्रवक्ता नितिन रोडे, सभासद सचिन धावडे, विजय धावडे, निलेश कळंबटे, अक्षय रामाणे, चंद्रकांत गोताड, सुर्यकांत गोताड, हरिश्चंद्र गोताड, प्रकाश गोताड, प्रशांत कांबळे, प्रथमेश कांबळे, प्रविण रोडे इ उपस्थित होते.