Home नाशिक नैताळे येथे मराठा आरक्षणासाठी सरणावर बसून आमरण उपोषणास सुरुवात

नैताळे येथे मराठा आरक्षणासाठी सरणावर बसून आमरण उपोषणास सुरुवात

167

आशाताई बच्छाव

IMG-20230910-WA0035.jpg

नैताळे येथे मराठा आरक्षणासाठी सरणावर बसून आमरण उपोषणास सुरुवात

स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे यांनी दिली भेट

दैनिक युवा मराठा
रामभाऊ आवारे निफाड

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जारंगे पाटील यांनी गेले दहा – बारा दिवसापासून मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केलेले आहे. त्यांना समर्थन म्हणून नैताळे येथील मराठा शेतकरी वाल्मिक गंगाराम बोरगुडे यांनी आज दि.१० सकाळी ८ वाजेपासून नैताळे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .
दरम्यान आज उपोषणाची माहिती मिळताच छत्रपती संभाजीराजे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. कालपासून उपोषणाची तयारी सुरू असून गावातील तरुणांनी घरोघरी जाऊन लाकडे व गोवऱ्या जमा केल्या. आज सकाळी असंख्य तरुण उपोषणस्थळी जमा झाले आहेत. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार घालून उपोषणास सुरुवात करण्यात आली. उपोषणस्थळी भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या गजरात भजन सुरू आहे. बोरगुडे यांना पाठिंबा म्हणून गावातील असंख्य युवक उपोषणास बसले आहे. निफाड पोलीस स्टेशनचे पो.निरीक्षक बी.एस.महाजन यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

◆ सरकारने राजकारण बाजूला ठेवत सर्वसामान्य गरीब मराठा समाजाला मराठा आरक्षणाच्या माध्यमातून समाजाला न्याय द्यावा. तमाम आंदोलक मराठा बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवून समस्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करीत आहे, आंदोलकांनी आमरण उपोषण करत असतांना तब्येतीची काळजी घ्या.
*छत्रपती संभाजीराजे–संस्थापक स्वराज्य पक्ष*

Previous articleखासदार समर्थक प्रदीप पाटील फाजगे यांचा असंख्य कार्यकर्त्यासह शेकाप मध्ये जाहीर प्रवेश
Next articleस्वराज्य संघटनेच्या मार्फत सामान्य जनतेची कामे करणार मा.खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे प्रतिपादन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.