आशाताई बच्छाव
उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे डायलिसिस विभाग व पी. आय. सी. यु. लहान मुलांच्या दक्षता विभागाचे उद्घाटन संपन्न.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी मनोज बिरादार
मुखेड – उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे डायलिसिस विभाग व पी.आय.सी.यू. लहान मुलाचे दक्षता विभागाचे उद्घाटन मा.श्री.आमदार डॉ. तुषार राठोड साहेब व माजी नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ भोसीकर तहसीलदार राजेश जाधव विजयकुमार पाटील डॉ. कदम सर डॉ गवाले सर,मुख्याधिकारी पाटे सर, लक्ष्मण पाटील खुशालराव पाटील अशोक गजलवाड व्यंकटराव लोहबंदे, डॉ व्यंकट सुभेदार, डॉ चंद्रकांत दबडे, काळे, गोविंद घोगरे,उत्तम बनसोडे, किशोरसिंह चौहाणं, राम पत्तेवार, नासार पठाण राजकुमार घोडके डॉ संतोष टाकसाळे डॉ बालाजी गरुडकर डॉ तोटवाड सर,हणमंत नरोटे,दत्ता पाटील बेटमोगरेकर,शिवाजी राठोड, सुधीर चव्हाण, विनोद दंडलवाद करण रोडगे, शिवा समराळे, समीर गजगे,सचिन पवार, खाझा धुंदी, बबन ठाकूर, पत्रकार शिवाजी कोनापुरे, ज्ञानेश्वर श्रीमंगले आदी मान्यवर उपस्थित होते.