Home सोलापूर सोलापूर जिल्हयातील अवैध दारू धंद्यावर कारवाईसाठी ग्रामीण पोलीसांची विशेष मोहीम’.

सोलापूर जिल्हयातील अवैध दारू धंद्यावर कारवाईसाठी ग्रामीण पोलीसांची विशेष मोहीम’.

179

आशाताई बच्छाव

IMG-20230708-WA0015.jpg

सोलापूर जिल्हयातील अवैध दारू धंद्यावर कारवाईसाठी ग्रामीण पोलीसांची विशेष मोहीम’.

युवा मराठा न्यूज नेटवर्क अँड ऑनलाईन वेब पोर्टल महादेव घोलप.

श्री. क्षेत्र पंढरपूर येथील आषाढी वारी बंदोबस्त संपताच सोलापूर ग्रामीण पोलीसांनी जिल्ह्यातील अवैध दारू धंद्यावर कारवाई करण्यासाठी “विशेष मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी ऑपरेशन परीवर्तन मधील बरेच पालक अधिकारी यांची बदली झाल्याने नवीन अधिकारी नेमून ‘ऑपरेशन परीवर्तन’ हा उपकम नव्याने सुरू केला आहे.

दिनांक ०६/०७/२०२३ रोजी जिल्ह्यातील अवैध दारू निर्मीती व विक्री करणारे ठिकाणी विशेष मोहीम अंतर्गत छापे घालण्यात आले असून त्यामध्ये पुढील प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यात अवैध दारूचे एकूण २२ गुन्हे गुन्हे दाखल करण्यात आले असून २८,४०५/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ऑपरेशन परीतवर्तन अंतर्गत एकूण ६ कैसेस करण्यात आले असून त्यामध्ये ५६०० लिटर २,७९,८००/- रूपये किंमतीचे गुळमिश्रीत रसायन जप्त करून नाश करण्यात आले आहेत. तर २० लिटर ६५०/- रूपये किंमतीची हा. भ. दारू जप्त करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कुर्डवाडी पोलीस ठाणे अंतर्गत ३८ देशी दारूच्या क्वॉर्टर बाटल्या किंमत रुपये २५२०/- जप्त करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण २८ गुन्हयात ३,११,३७५/- रूपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

विशेष मोहीम व ऑपरेशन परीतर्वतन अंतर्गत दररोज कारवाई करण्यात येणार असून जिल्ह्यातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्यात येणार आहेत.

Previous articleमालेगाव येथे निशुल्क चिकित्सा शिबीर मोठया उत्सहात संपन्न
Next articleइंदिरानगर येथील निर्मल विद्या मंदिर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.