Home गडचिरोली कुकडहेटी येथील सहकारी संस्थेच्या संचालकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

कुकडहेटी येथील सहकारी संस्थेच्या संचालकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

162

आशाताई बच्छाव

Screenshot_20230706-211327_WhatsApp.jpg

कुकडहेटी येथील सहकारी संस्थेच्या संचालकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश                                       गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ)-

ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रातील सिंदेवाही तालुक्यातील कळमगाव येथील आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेतील संचालकांनी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काॅंग्रेस नेते, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

सिंदेवाही तालुक्यातील कुकडहेटी येथील रहिवासी असलेले राजेंद्र जांभूळे, हितेंद्र निमगडे, कैलास भोयर हे कळमगाव आदीवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक आहेत. ते यापूर्वी भाजपा पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते होते व भाजपाकडून सहकारी संस्थेवर निवडुन गेले होते. परंतु ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने सुरू असलेल्या विकासकामांचा झपाटा बघता त्यांच्या कार्यप्रणाली व नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी काॅंग्रेस पक्षात ब्रम्हपुरी येथील आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला आहे.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जि.प.सदस्य डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्या स्मिताताई पारधी, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले यांसह अन्य काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous articleरामसेतू हा प्रेमाचा आणि सर्वधर्मसमभावाचा सेतू -पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
Next articleराज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती होणार..? चांगले गोष्ट आहे.. शरद पवारांची प्रतिक्रिया
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.