आशाताई बच्छाव
नाशिक,(अँड विनया नागरे)-दिनांक 4 जुलै सायंकाळी ठीक 8:00 वाजता जागृती फाऊंडेशन नासिक संस्थापिका सौ ललिता ताई रामदास नवघिरे ( सार्वभौम ह्यूमन राईस नाशिक शहर अध्यक्ष ) या घरी जात असताना जत्रा हॉटेल परिसरात एक मुलगी कु.प्रियंका गांगुर्डे ,वय :17 जोर जोरात धावत आणि रडत पळत होती मुलगी अतिशय घाबरलेली असताना ललिता ताईंनी मुलीला थांबवले व तिला विचारले काय झाले त्याच क्षणाला ललिता ताईंनी त्यांचा मुलगा शुभम नवगिरे यांना कॉल करून बोलावले व त्यानंतर प्रशांत शेळके यांना कॉल करून तिथे बोलवले तोपर्यंत ललिता ताईंनी पाण्याची बॉटल घेऊन तिला पाणी पाजले व शांत केले . प्रशांत तिथे पोहचल्यानन्तर तिथे मुलीकडून सर्व हकीकत समजुन घेतली तर सदर मुलगी ही ओझर जवळील दिक्षी या गावची असुन ती 10 वि मध्ये शिकत आहे ती ओझर रोड येथे मैत्रिणी कडे आली असताना घरी परत जाण्यासाठी निघाली असता अज्ञात वाहनातून 3 ते 4 तरुण उतरले आणि त्यातील एक जण तिला गाडीत बसण्याची बळजबरी करत होते त्या प्रसंगावधानातून मुलीने कसा बसा बचाव करत ती घाबरून पळत सुटली होती त्यावेळी ती सौ ललिता नवघिरे यांना दिसली व एक आधार म्हणुन ती त्यांच्या जवळ थांबली सदर मुलीस सौ ललिता नवघिरे श्री प्रशांत शेळके शुभम नवगिरे यांनी आडगाव पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊन तिच्याकडे कुणाचाही मोबाईल नंबर नसताना आमदार अनिल अण्णा कदम यांनी दीक्षि येथील सरपंच चौधरीसाहेब यांना कॉल करू तिच्या नातेवाईकांना आडगाव पोलीस स्टेशनला पाठवले या सर्व गोष्टींसाठी पिंपळगाव ची केशव नाना बनकर यांचे देखील सहकार्य लाभले त्याचबरोबर प्रशांत शेळके यांनी दिक्षी येथील एका मित्राला फोन करून तिच्या घरापर्यंत निरोप दिला सर्वांच्या मदतीने सदर मुलीचा भाऊ पोलीस स्टेशन ला येऊन मुलीस रात्री 10:30 मी. सुखरूप परत घरी घेऊन गेला






