Home जळगाव जून संपला, तरी दमदार पाऊस नाही! जळगाव जिल्ह्यात केवळ ‘इतके’ टक्केच पेरण्या

जून संपला, तरी दमदार पाऊस नाही! जळगाव जिल्ह्यात केवळ ‘इतके’ टक्केच पेरण्या

277

आशाताई बच्छाव

IMG-20230630-WA0040.jpg

जून संपला, तरी दमदार पाऊस नाही! जळगाव जिल्ह्यात केवळ ‘इतके’ टक्केच पेरण्या

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.

राज्यात खोळंबलेला पाऊस २३ जून पासून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला. मात्र जळगाव जिल्ह्यात जून संपत आला तरी अद्यापही पेरणी योग्य पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आता शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 8 ते 9 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.
यंदा बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पाऊस लांबला असून जून महिना संपत आला तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नाहीय. मागील काही दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी दमदार पाऊस सुरु आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात पाऊस रुसला आहे. पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या. जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 8 ते 9 टक्के पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र 7 लाख 69 हजार 601 इतके आहे. त्यापैकी केवळ 68 हजार 530 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात देखील 67 हजार 194 हेक्टर कापसाची पेरणी झाली आहे. त्यामुळे उडीद, तूर, सोयाबीन, मूग, तीळ या पिकांची पेरणी झाली नाहीय. दरम्यान कृषी विभागाने 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केलं आहे.
जिल्ह्यात केवळ 38 मिमी पाऊस दरम्यान, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दररोज पावसाचे ढग दाटून येत असले तरी पाऊस हुलकावणी देत आहे. काल गुरुवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. हा पाऊस दमदार नसला तरी शेतकऱ्यांना धीर देणार आहे. अद्यापही शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38 मिमी पाऊस झाला.

Previous articleवाशिम शहर तपास पथकाच्या तीन दिवसांत ०४ शस्त्र अधिनियम कारवाया ; ०३ खंजीरांसह ०१ देशी कट्टा जप्त.
Next articleकुरुळी | निघोजे, केळगाव, वडगाव घेनंद, मरकळ, सोळू, पिंपळगाव, कोयाळी, खेड तालुका भागात पेरण्या सुरू.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.