Home नाशिक मालेगांव पंचायत समितीपुढे व-हाणे प्रकरणात आता पुन्हा ११ जुलैपासून एल्गार

मालेगांव पंचायत समितीपुढे व-हाणे प्रकरणात आता पुन्हा ११ जुलैपासून एल्गार

351

राजेंद्र पाटील राऊत

FB_IMG_1687826822941.jpg

मालेगांव पंचायत समितीपुढे
व-हाणे प्रकरणात आता
पुन्हा ११ जुलैपासून एल्गार
मालेगांव,( प्रतिनिधी विजय चांदणे)–                  व-हाणे,ता.मालेगांव प्रकरणात प्रशासनाकडून वारंवार दिरंगाई व निष्काळजीपणा करुन वेळकाढू धोरण ठेऊन न्यायासाठी वेठीस धरुन वंचीत ठेवणा-या प्रशासनाच्या निषेधार्थ युवा मराठा महासंघाच्या वतीने पुन्हा एकदा एल्गार पुकारण्यात आला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलेल्या व-हाणे ,ता.मालेगांव प्रकरणाचा पाठपुरावा हा सलग तीन वर्षापासून सुरुच आहे.तरीही प्रशासनाला जाग येत नसल्याच्या कारणावरुन व प्रशासन दोषी व्यक्तीना पाठीशी घालत असल्याचा निंदनीय प्रकार चव्हाटयावर येऊनसुध्दा प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करीत आहे.असा प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच महासंघाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील राऊत यांनी प्रशासन ठोस कारवाई करीत नसल्याच्या निषेधार्थ ११ जुलै २०२३ पासून मालेगांव पंचायत समितीसमोर पुन्हा उपोषण आंदोलनाचा एल्गार पुकारण्यात आला असल्याचे सांगितले.त्याबाबत सबंधिताना निवेदने देण्यात आलेली असून,व-हाणे प्रकरणात जिल्हा परिषदेने स्थापन केलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालात दोषी व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्याची जबाबदारी हि मालेगांवचे गटविकास अधिकारी यांची असल्याचे स्पष्ट नमूद केलेले असल्याने त्याशिवाय व-हाणे ग्रामपंचायतीच्या बोगस व बनावट कारभाराची चौकशी सुध्दा मालेगांव पंचायत समिती प्रशासनानेच करायची आहे.त्यामुळे येत्या ८ जुलै २०२३ पर्यत दोषी असलेल्या सगळ्याच सबंधितावर गुन्हे दाखल न केल्यास ११ जुलै पासून आमरण उपोषण आंदोलनाचा दिलेला एल्गार कुठल्याही परिस्थितीत राबविण्याचा इशारा शेवटी युवा मराठा महासंघाचे राजेंद्र पाटील राऊत यांनी दिला आहे.

Previous articleआषाढी एकादशी निमित्त विशेष लेख
Next articleवाशिम शहर तपास पथकाच्या तीन दिवसांत ०४ शस्त्र अधिनियम कारवाया ; ०३ खंजीरांसह ०१ देशी कट्टा जप्त.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.