Home नाशिक गटसचिवांचे थकीत वेतन देण्याची मागणी

गटसचिवांचे थकीत वेतन देण्याची मागणी

448

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0054.jpg

गटसचिवांचे थकीत वेतन देण्याची मागणी
मालेगांव,(प्रतिनिधी आशाताई बच्छाव)-जिल्ह्यातील गटसचिवांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने जिल्हा सहकारी संस्था,सचिव व कर्मचारी युनियन अंतर्गत मालेगांव तालुका गटसचिव संघटनेतर्फ शुक्रवार दिनांक १६ जुन २०२३ पासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
दरम्यान रखडलेली थकीत वेतन त्वरीत मिळावे या मागणीसाठी सहकारी संस्था उपनिबंधक सचिन घोडके यांना तालुका गटसचिव संघटनेने सोमवारी दि.१९ रोजी निवेदन दिले आहे.जिल्ह्यातील गटसचिवांचे फेब्रुवारी ते मे अशा चार महिन्यांपासून वेतन अदा करण्यात आले नाही.जिल्हास्तरीय समितीने कुठल्याही प्रकारे पत्रव्यवहार न करता बेकायदेशीरपणे वेतन रोखले आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या गटसचिवांना उदरनिर्वाहास,मुलांच्या शैक्षणिक कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.गृहकर्ज,हप्ते,विमा हप्ते,वैद्यकीय खर्चासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे तातडीने वेतनबाबत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.निवेदनावर राज्यध्यक्ष विश्वनाथ निकम तालुका संघटना प्रतिनिधी उमेश बोरसे यांच्या सहया आहेत.

Previous articleलोहगावात माहिती सेवा समिती करणार एकदिवसीय लाक्षणिक उपोषण.
Next articleदेगलूर उपजिल्हा रुग्णालय रामभरोसे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.