Home नांदेड शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या.प्रविण मंगनाळे.

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या.प्रविण मंगनाळे.

170

आशाताई बच्छाव

IMG-20230620-WA0011.jpg

शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्या.प्रविण मंगनाळे.

देगलूर प्रतिनिधी, गजानन शिंदे

देगलूर( दि.२०) गेल्या काही वर्षांपासून कधी अतिवृष्टी तर कधी काढणीच्या वेळी होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास हिसकावून घेतला जात आहे.खरीप व रब्बी हंगमातील पिकाची नासाडी अवेळी होत असलेल्या पावसाने होताना दिसून येते.त्यातूनही आमचा शेतकरी काही पिकवला तर त्याला भाव मिळत नाही.कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाना सामोरे जावे लागते.तसेच बोगस बियाणे व बियाणांची व खताची होत असलेला काळाबाजार अश्याने शेतकरी बेजार झाला आहे.
सततच्या नापिकीमुळे मिळत नसलेल्या भावाने शेतकऱ्याजवळ बि-बियाणे घेण्यासाठी पैसे नसतात.त्यामुळे ते सावकारी कर्ज काढून पेरणी करतात व ते सावकारी कर्जाच्या विळख्यात सापडले जातात व त्यातून त्यांची मुक्तता होताना दिसून येत नाही.
या सर्व संकटामुळे शेतकरी हतबल होतो.मराठवाड्यात शेतकऱ्यांचा आत्महत्येचे प्रमाण वाढत चालले आहे.अश्या सर्व संकटातून शेतकऱ्याची सुटका करण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी बियाणे व खते विकत घेण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी कारण शेतकरी जगला तरच देश जगेल.त्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी एकरी दहा हजार रुपये आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम यांच्यामार्फत शासनाला मनसेचे जिल्हा सचिव प्रवीण मंगनाळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन बरसमवार,तालुकाध्यक्ष मन्मथ परबते,शहराध्यक्ष चंदू अक्यमवार,माजी शहराध्यक्ष विश्वंभर कंतेवार आदी उपस्थित होते.

Previous articleगद्दारांचे डोके, खोक्यांनीच केले ओक्के देगलूर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गद्दार दिवस म्हणून साजरा.
Next articleभगवान श्रीकृष्ण उपदेश —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.