Home गडचिरोली शेतकरी कामगार पक्षाची १७ जून ला जिल्हास्तरीय सभा

शेतकरी कामगार पक्षाची १७ जून ला जिल्हास्तरीय सभा

234

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0046.jpg

 

शेतकरी कामगार पक्षाची १७ जून ला जिल्हास्तरीय सभा

नवीन कार्यकारिणी निवडीवर चर्चा होणार

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीची नव्याने निवड करुन पक्ष विस्तार करण्यासंबंधात चर्चा करण्यासाठी शनिवारी १७ जूनला पक्ष सभासदांची सभा आयोजित करण्यात आली आहे.

स्थानिक प्रेस क्लब सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या या सभेत शेतकरी कामगार पक्षाच्या नवीन जिल्हा व तालुका समित्यांचे सदस्य निवडीवर चर्चा करण्यात येवून मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. यासोबतच येणाऱ्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुका लढण्यासंबंधाने पक्षाचे स्थानिक स्तरावरची भूमिका आणि नियोजन ठरविण्यात येणार आहे.

त्यामुळे पक्षाचे गाव शाखेचे चिटणीस, खजिनदार, सहचिटणीस आणि सक्रिय पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर यांनी केले आहे.

Previous articleमहा जनसंपर्क अभियानाअंतर्गत पोलीस महिला समुपदेशिका वैशाली बांबोळे यांचा सत्कार
Next articleभाजप महिला मोर्चाच्या वतीने आधार विश्व फाउंडेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा सन्मान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.