Home गडचिरोली मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा...

मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान

174

आशाताई बच्छाव

IMG-20230613-WA0029.jpg

मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या वतीने अंगणवाडी सेविकांचा सन्मान

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ) :- 
मोदी -9 महा जनसंपर्क अभियान निमित्याने भाजप महिला आघाडीच्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे यांच्या नेतृत्वात महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी नवेगाव येथील आंगणवाडी केंद्र क्र. 217 व 216 ला भेट दिली . व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान केला तसेच अंगणवाडी केंद्रा अंतर्गत लहान मुले व स्तनदा माता यांची भेट घेऊन पोषण आहाराबाबत माहिती जाणून घेतली व ९ वर्षात मोदी सरकारने केलेल्या विकास कामाची तसेच जनहितार्थ लोककल्याणकारी योजनांची माहिती त्यांना दिली. तसेच केंद्र सरकारच्या योजनेच्या लाभार्थी महिलांची भेट घेऊन मिळणाऱ्या लाभाबाबत माहीती जाणून घेतली.
यावेळी भाजप महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीताताई पिपरे, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडी च्या जिल्हा महामंत्री वर्षाताई शेडमाके, अर्चना चन्नावार व महिला पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleखासदार अशोक जी नेते यांनी केलेल्या प्रयत्नांनी मेडिगट्टा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर धनादेशाचे वाटप …
Next articleलोह खाणी तातडीने रद्द करा : शेतकरी कामगार पक्षाची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.