Home जळगाव जळगांव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण या भागातील घरकुल धारक मागील १२ वर्षापासून मुलभूत...

जळगांव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण या भागातील घरकुल धारक मागील १२ वर्षापासून मुलभूत सुविधापासून (पाणी, वीज, रस्ते) वंचित असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (जनहित) व मन्यारखेडा ग्रामस्थ

199

आशाताई बच्छाव

IMG-20230604-WA0002.jpg

जळगांव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण या भागातील घरकुल धारक मागील १२ वर्षापासून मुलभूत सुविधापासून (पाणी, वीज, रस्ते) वंचित असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा
आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण सेना (जनहित) व मन्यारखेडा ग्रामस्थ

जळगांव जिल्हा ब्यूरो चिफ, योगेश पाटील.
जळगांव :- जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावठाण हे गाव मागील १२ वर्षापासून त्याठिकाणी बसलेले असून सदरील तेथे बहुतेक करुन आदिवासी समाजाचे लोक असून त्याठिकाणी ग्रामस्थ मागील १२ वर्षापासून राहत असून आज रोजी ते मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत.

तरी सुस्त प्रशासनाला जाग येणेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (जनहित), अंगीकृत संघटना तसेच मन्यारखेडा गावठाण भागातील ग्रामस्थ दिनांक ५/६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हंडा मोर्चा काढून आपले निवेदन सादर करणार आहे.

तरी सदरील मोर्चाला सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आजी, माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक व सर्व अंगीकृत संघटना यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष ( जनहित ) राजेंद्र निकम यांनी केलेले आहे.

Previous articleपोलिस उप निरीक्षकाचा स्टेट बँकेच्या लुटीत सहभाग उघड
Next articleदरसवाडी माध्यमिक विद्यालयाचा शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल– विद्या वाघाडे 89% गुण मिळवून विद्यालयात प्रथम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.