Home नाशिक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लागू होणार ड्रेस कोड

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लागू होणार ड्रेस कोड

194

आशाताई बच्छाव

IMG-20230528-WA0045.jpg

सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी लागू होणार ड्रेस कोड

भास्कर देवरे
युवा मराठा न्यूज नेटवर्क

नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर आता नवीन नियम लागू होणार आहे. आता सप्तशृंगी देवीच्या मंदिरात ड्रेसकोड लागू होणार आहे. मंदिराच्या व्यवस्थापन ,ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता पूर्ण पेहरावातच देवीचं दर्शन करता येणार आहे. भाविक जीन्स किंवा इतर पेहरावा करून देवीच्या दर्शनाला येतात त्यात वाईन पर्यटन साठी देखील पर्यटक येतात. त्यावर यावर घालण्यासाठी आता मंदिराच्या व्यवस्थापन, ग्रामस्थ आणि विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. भाविकांना आता ड्रेसकोडची सक्ती करण्यात येणार आहे. नाशिकच्या वणीची देवी सप्तशृंगी हे साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध पीठ आहे. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर दूरवरून भाविक येतात.आता भाविकांसाठी ड्रेस कोड करण्याचा निर्णय घेतलेला असून पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी नेसूनच आरतीनंतर देवीचं दर्शन घेता येणार आहे. देवीच्या गाभाऱ्यात जाताना पुरुष आणि महिलांना विशिष्ट पेहराव करणे बंधनकारक असणार. नोंदणी केलेल्या भाविकांनाच गाभाऱ्यात प्रवेश करता येणार आहे. आता पूर्ण पेहरावा करून आल्यावरच देवी सप्तशृंगीचे दर्शन भाविकांना करता येणार आहे.

Previous articleदरोडा टाकण्याच्या तयारीतील दरोडेखोरांना यवत पोलिसांनी केले जेरबंद
Next articleनाशिक जिल्ह्यात ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती असलेलं घर पाहण्यासाठी लोकांची गर्दी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.