Home नाशिक श्रीक्षेत्र भगूर येथे रविवारी ब्राह्मण महासंघ आयोजित भारतरत्न स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर...

श्रीक्षेत्र भगूर येथे रविवारी ब्राह्मण महासंघ आयोजित भारतरत्न स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा–

201

आशाताई बच्छाव

Screenshot_20230527-055900_Google.jpg

श्रीक्षेत्र भगूर येथे रविवारी ब्राह्मण महासंघ आयोजित
भारतरत्न स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम व उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी मेळावा–

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

महाराष्ट्रातील सर्वात मोठं ब्राह्मण संघटन आयोजित
भारतरत्न रविवार २८ मे २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त सावरकर भक्तांचे तीर्थक्षेत्र भगूर येथे सकाळी १०.३० वा स्वातंत्र्यवीर सावरकर जन्मस्थळ (वाडा) भगूर जि नाशिक येथे अभिवादन कार्यक्रम व
उत्तर महाराष्ट्र पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा व
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ४१ भाषणे व आचार्य अत्रे लिखीत १९ अग्रलेखांच्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ब्राह्मण महासंघ विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी लासलगाव यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हेमंतजी गोडसे खासदार नाशिक रहाणार असून कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून श्री महंत सुधीरदासजी महाराज काळाराम मंदिर नाशिक, श्री महंत स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे महाराज श्री मंडलाचार्य पिठाधीश्वर नाशिक आदी उपस्थित राहणार असून यावेळी सावरकरांची ४१ भाषणे व क्रातीकारकांचे कुलपुरुष सावरकर ( आचार्य अत्रे लिखित १९ अग्रलेख) पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार या अभिवादन व मेळावा कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्वागोत्सुक ब्राह्मण महासंघ संस्थापक अध्यक्ष आनंद दवे, ब्राह्मण महासंघ विश्वस्त मनोज तारे, सौ स्मिता कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी, सौ श्वेता कुलकर्णी तसेच दिलीप जोशी जिल्हा अध्यक्ष नाशिक, भगवंत (बाळाभाऊ) पाठक शहर अध्यक्ष नाशिक,सौ निकिता पाठक शहर अध्यक्ष महिला आघाडी नाशिक आदींनी केले आहे.

Previous articleआम आदमी पार्टीची पंढरपूर ते रायगड स्वराज्य यात्रा
Next articleयोजनांचे लाभधारक व कार्यान्वयीन यंत्रणेसाठी “शासन आपल्या दारी” अभियान मोलाचे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.