आशाताई बच्छाव
अमरावती विभाग राज्यात चौथ्या क्रमांकावर, ९२.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण; मुलींची संख्या अव्वल.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा
पी.एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती विभागीय शिक्षण मंडळाचा यावर्षीचा निकाल हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. पाच जिल्ह्याची व्याप्ती असलेल्या या विभागातून यावर्षी ९२.७५ विद्यार्थी टक्केवारी उत्तीर्ण झाले. परीक्षेसाठी १लाख ३९हजार७६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १लाख३८हजार ५६४विद्यार्थ्यां विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले तर १लाख२८हजार५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नेहमीप्रमाणे यावर्षीही मुलींनी बाजी मारली असून मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९०.९४ टक्के आहे. अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, व वाशिम हे पाच जिल्हे मिळून अमरावती विभागीय शिक्षण मंडळ तयार झाले आहे. यावर्षी मंडळाच्या परीक्षेवर महसूल खात्याच्या पथकांनी देखरेख केली होती. त्यामुळे कॉपीला जराही थारा नव्हता. तरीही पाच जिल्ह्यात मिळून २० कॉफी बहादूर यांना एक परीक्षेपूर्वी ठेवण्यात आल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्ष नीलिमा टाके व सचिव तेजराव काळे यांनी यावेळी दिली. काळे म्हणाले, राज्यात ९६.०१ टक्क्यासह कोकण विभागाने प्रथम क्रमांक पटकाविला असून ९३.३४ टक्क्यासह पुणे दुसऱ्या तर ९३.२८ टक्क्यासह कोल्हापूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर अमरावतीचा (९०.३५) टक्के क्रमांक येत असून विदर्भात तो पहिल्या क्रमांकावर आहे. परीक्षेदरम्यान काही केलेल्या सुधारणा, वर्षभर बजावलेल्या विद्यार्थी केंद्रित भूमिका व परीक्षा दरम्यान तयारीसाठी प्रत्येक पेपरला किमान एक दिवस दिलेला वेळ यामुळे शक्य झाले, हेही सचिव व अध्यक्षांनी स्पष्ट केले तसेच जिल्हा नियोजन टक्केवारी, अकोला ९३.११, अमरावती ९०.७८, बुलढाणा ९३.६९, यवतमाळ ९१.९८, वाशिम ९५.४५. एकूण ९२.७५आहे. शाखा निहाय निकालाची टक्केवारी, विज्ञान ९८.१४, कला ८६.६४, वाणिज्य ९३.२५, व्होकेशनल८५.१० तर तांत्रिक शाखा ४८.००. असे एकूण ९२.७५ टक्केवारी थ निकाल आहे.