Home अकोला जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण; २०० जणांचा सहभाग

जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण; २०० जणांचा सहभाग

181

आशाताई बच्छाव

IMG-20230524-WA0044.jpg

जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे मान्सूनपूर्व प्रशिक्षण; २०० जणांचा सहभाग

अकोला : (सतिश लाहुळकर ब्यूरो चीफ अकोला)जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाच्या मान्सूनपूर्व प्रशिक्षणास आजपासून प्रारंभ झाला. नागपूर येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकाने हे प्रशिक्षण दिले. येते दोन दिवस जिल्ह्यात हे प्रशिक्षण सुरु राहणार आहे.

मान्सूनपुर्व तयारीसाठी जिल्हा आपत्ती प्रतिसाद दलाचे आज प्रशिक्षण घेण्यात आले. नियोजन भवनात हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे मुर्तिजापूर तहसिलदार शिल्पा बोबडे, नायब तहसिलदार विजय सुरळकर, सपना काळे , आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संदीप साबळे हे यावेळी उपस्थित होते.

राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर येथील तज्ज्ञ अमोल गोखले, एन.डब्ल्यू. वाडकर, वाय.एन. काकडे, आर.ए. चवदळ, एम.पी. खांडके, रितेश सिंग यांच्या पथकाने जिल्ह्यातील दलाला प्रशिक्षण दिले.

जिल्ह्यातील आपत्ती प्रतिसाद दलातील पोलीस, होमगार्ड, तलाठी, मंडळ अधिकारी, अग्निशामक दलाचे जवान तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशा एकूण २०० जणांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. या प्रशिक्षणात टाकाऊ वस्तूंपासून बचाव साहित्य तयार करणे, अडकलेल्या लोकांची सुटका करणे, त्यांना प्रथमोपचार करणे, पूर वा अन्य आपत्ती प्रसंगी करावयाची बचाव कार्ये याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण देण्यात आले.

आणखीन दोन दिवस हे प्रशिक्षण प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन दिले जाणार आहे. त्यात उद्या म्हणजेच गुरुवार दि.२५ रोजी पोपटखेड येथे तर शुक्रवार दि.२६ रोजी महान येथे हे प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती संदीप साबळे यांनी दिली.

Previous articleनाशिक शहर पोलिस उपायुक्तपदी मोनिका राऊत
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची घेतली मध्यरात्री भेट!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.