Home नांदेड ▪️ लोहा कंधार मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आ. श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली...

▪️ लोहा कंधार मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आ. श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट

243

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0038.jpg

▪️ लोहा कंधार मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आ. श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
▪️ मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांना मिळणार गती

अंबादास पाटील पवार
लोहा / प्रतिनिधी
श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुका देवी मंदिर परिसरात स्कायवॉक कामाच्या शुभारंभ प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोहा-कंधार मतदारसंघाचे आ. श्यामसुंदर शिंदे, शे. का. पा. च्या महिला प्रदेशाध्यक्षा आशाताई शिंदे यांनी लोहा-कंधार मतदारसंघातील विविध प्रलंबित कामाविषयी चर्चा करून मतदारसंघातील विकास कामांना गती मिळावी यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दक्षिण भारतात प्रसिद्ध असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव येथे यात्रेदरम्यान खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रा, तेलंगणा यासह येणाऱ्या विविध राज्यातून हजारो भाविक भक्तांची यात्रा काळात सोय व्हावी यासाठी माळेगाव यात्रेला भरीव निधी बरोबर परिसरातील रस्त्याची मागणी करताच नितीन गडकरी यांनी लोहा-कंधार मतदारसंघातील जनतेचे प्रश्न घेऊन या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आश्वासित केले.
आ. श्यामसुंदर शिंदे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे लोहा-कंधार मतदार संघातील अनेक प्रलंबित कामे रस्त्याबरोबरच शहरातील नागरिकांना धुळीपासून आता लवकरच दिलासा मिळणार असून बायपास टू बायपास तसेच लोहा ते गंगाखेड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले.

Previous articleमराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांनी पावसाळ्यापूर्वी केली ग्रामस्वच्छता
Next articleझुणका भाकर केंद्रातून गांजा विक्री, सीपीच्या विशेष पथकाची धाड.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.