Home पुणे मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांनी पावसाळ्यापूर्वी केली ग्रामस्वच्छता

मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांनी पावसाळ्यापूर्वी केली ग्रामस्वच्छता

207

आशाताई बच्छाव

IMG-20230522-WA0035.jpg

मराठवाडा जनविकास संघाच्या कार्यकर्त्यांनी पावसाळ्यापूर्वी केली ग्रामस्वच्छता

पुणे, ब्युरो चिफ. उमेश पाटील
काही दिवसातच पावसाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने धारूर (धाराशिव) येथे सलग सातव्यांदा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी ग्राम स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला.
मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष वृक्षमित्र अरुण पवार, सरपंच बालाजी पवार, समाजसेवक रत्नाकर खांडेकर, डॉ. अण्णासाहेब गरड, जगन्नाथ महाराज, प्रदीप कदम, महेश गडदे, विशाल पवार, अभिजीत कामटे, बालाजी गुरव, सोमनाथ कोरे, जयसिंग पाटील, श्रीराम कदम, महेश गुरव, बाळासाहेब कोरे, अमर पाटील, हरी पवार, काका पाटील, लक्ष्मण कोनाले, पांडुरंग लोहार, तसेच गावातील युवक वर्गाने मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
अरुण पवार यांच्या संकल्पनेतून व सरपंच बालाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियानाची भैरवनाथ मंदिर येथे सुरुवात करण्यात आली. मंदिर परिसरातील पुरातन काळातील जुनी (विहीर) बारव पावसाळा स्वच्छ करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते विशाल पवार आणि श्रीराम कदम या दोघांनी धाडसाने पन्नास फूट खोल विहिरीमध्ये दोरीच्या साहाय्याने खाली उतरून विहीर स्वच्छ करण्यात मोलाचे योगदान दिले. तसेच विहिरीमध्ये पाणी नसतानाही सुद्धा एक कासव जिवंत आढळून आले. त्यास पाणी असलेल्या दुसऱ्या विहिरीमध्ये सोडून जीवनदान देण्यात आले. मंदिर परिसरात यात्रेदरम्यान झालेला एक टन कचरा कार्यकर्त्यांनी गोळा करून त्याची विल्हेवाट लावली. त्या दरम्यान झाडावरील तहानलेल्या माकडाला पाणी ठेवण्यात आले.
मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षांपासून धारूर ते तुळजापूर बायपासपर्यंतच्या हजारो झाडानां दररोज टँकरद्वारे पाणी दिले जात आहे. तसेच वन्यप्राण्यांची तहान भागविण्याचे काम केले जात आहे.

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत आज कार्यशाळा
Next article▪️ लोहा कंधार मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी आ. श्यामसुंदर शिंदे यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.