Home नाशिक सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक…!

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक…!

157

आशाताई बच्छाव

IMG-20230329-WA0116.jpg

सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक…!
(युवा मराठा न्यूज
नयन शिवदे सटाणा विशेष प्रतिनिधी)
जळगाव येथून वणी गडावर जाणारी पालखी पाळधी गावात प्रवेश करतात साठ घर मोहल्ला जवळ येताच तिच्यावर दगडफेक करण्यात आली जळगाव येथून वणी गडावर जाणारी पालखी पाळधी गावातून दरवर्षी जाते यावेळीही पालखी पाळधी गावातून जात असताना साठगर मोहल्यातील मस्जिद जवळ येताच तिच्यावर दगडफेक करण्यात आली.या घटनेनंतर पळापळ सुरू झाली घटनेची माहिती कळताच पाळधी पोलिसांनी धाव घेतली मात्र त्यांच्यावरही दगडफेक सुरुच होती. यावेळी जळगाव धरणगाव येथील जादा पोलीस कुमक मागविण्यात आली तर दंगा नियंत्रण पथकही मागविण्यात आले. पोलिसांच्या गाड्यांवर झालेल्या दगडफेकीत त्यांच्या गाडींचे काच फुटून बरेच नुकसान झाले.तर यावेळी काही दुकानांवर दगडफेक करण्यात आली.
पूर्ण गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात पोलीस फिरून शांतता ठेवण्याचे आवाहन करीत आहेत.
याबाबत उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.