Home जालना छ. संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या विराट सभेस हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामिल होणार...

छ. संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या विराट सभेस हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामिल होणार जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय

144

आशाताई बच्छाव

छ. संभाजीनगर येथील महाविकास आघाडीच्या विराट
सभेस हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सामिल होणार
जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय
जालना (दिलीप बोंडे ब्युरो चीफ) ः केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आणि सामान्य जनता हवालदिल झालेली आहे. युवकांच्या हाताला काम नसल्यामुळे बेसुमार बेरोजगारी वाढल्याने जनतेचे जगणे कठिण झाले आहे. त्यावर आवाज उठविण्यासाठी महाविकास आघाडीची विराट सभा दिनांक 02 एप्रिल रविवार रोजी सायंकाळी 5 वाजता मराठवाडा सांस्कृतीक मंडळ मैदान छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पुर्वतयारीसाठी जालना जिल्हा महाविकास आघाडीच्या बैठकीत हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार रोजी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या विराट सभेस राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसनेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, विरोधीपक्षनेते अजित पवार, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आदी महाविकास आघाडीचे नेते मार्गदर्शन करणार आहेत.
राज्यातील शासन हे केवळ आरोप प्रत्यारोपाच्या पाठ जनतेसमोर मांडत आहे आणि शेतकऱ्यांचे बेरोजगारांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. देशात आणि राज्यामध्ये भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे प्रचंड महागाई वाढली आहे. खरं पाहता सरकारने सामान्य जनतेच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यायला पाहिजे. परंतू तसे होत नसतांनाचे दिसून येत आहे. राज्यातील महाविकास आघाडीने सरकारला जागं करण्यासाठी एकजुट महाविकास आघाडीची विराट जाहिर सभेचे छत्रपती संभाजी नगर येथे रविवार रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये जालना जिल्ह्यातून तीस हजार कार्यकर्ते रवाना होणार आहेत

Previous articleराष्ट्रीय फास्ट फाईव नेटबॉल स्पर्धेकरिता जालना जिल्ह्याच्या आकाश पवार व किरण पाटील यांची निवड
Next articleसप्तशृंगी गडावर जाणाऱ्या पालखीवर दगडफेक…!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.