Home नाशिक आरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!!

आरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!!

145

आशाताई बच्छाव

IMG-20230128-WA0023.jpg

आरोग्य विभागातील स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याची मागणी!!
श्रीमती आशाताई बच्छाव
मालेगांव- आरोग्य विभागातंर्गत येणाऱ्या प्राथामिक आरोग्य केंद्र,उपकेंद्रे,ग्रामीण रुग्णालयात वर्षानुवर्षेपासून कार्यरत असलेल्या स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी आयटक युनियनचे राजु देसले यांनी शासनाकडे एका निवेदनाव्दारे केली आहे. शासनाला सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,कोरोना काळात अत्यल्प मानधनावर सेवाधर्म जोपासणा-या स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना दरमहा १०,०००/- दहा हजार रुपये मानधन देण्यात यावे,आणि स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेवेत कायमस्वरुपी नियुक्त करण्यात यावे,अशा स्वरुपाच्या मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.दरम्यान नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांना आयटकच्या पदाधिका-यांनी आज वरील मागण्याबाबत निवेदन सादर केले आहे.

Previous articleमेशीत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न
Next articleखास बातमी”बरे झाले गद्दार गेले, त्यांच्यामुळे हिरे सापडले; उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर जळजळीत टीका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.